शासकीय योजना लोकांच्या हिताच्या
By Admin | Updated: August 21, 2015 00:21 IST2015-08-21T00:21:52+5:302015-08-21T00:21:52+5:30
समाजातील शेवटच्या टोकापर्यंत विकास साधता यावा, यासाठी शासनाने विविध शासकीय योजना अमलात आणलेल्या आहेत.

शासकीय योजना लोकांच्या हिताच्या
समरीत यांचे प्रतिपादन : एकोडीत महाराजस्व अभियान
साकोली : समाजातील शेवटच्या टोकापर्यंत विकास साधता यावा, यासाठी शासनाने विविध शासकीय योजना अमलात आणलेल्या आहेत. या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळत असून ते आपला विकास करीत आहेत. यात मग शासनाचा महाराजस्व अभियान असो वा इतर शासकीय अभियान असो. सर्व योजना या लोकांच्या हितासाठीच आहेत. मात्र या योजनांची अंमलबजावणी करताना कर्मचारी व अधिकारी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, असे प्रतिपादन एकोडी येथील सरपंच अनिरुद्ध समरीत यांनी केले.
तलाठी कार्यालय एकोडी येथे महसूल विभागामार्फत आयोजित महाराजस्व अभियान कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुभाष चचाणे, गोपीनाथ मेश्राम, पोलीस पाटील मेघा हुमे, ग्रामसेवक एच.एच. लंजे उपस्थित होते.
या महाराजस्व अभियान कार्यक्रमात गाव नमुना आठ अ चे वाचन करण्यात आले. गावातील मयत खातेदारांचे नाव शोधून त्याचे वारस फेरफार घेण्यासाठी वारसांना तलाठी कार्यालयाशी संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आली. यावेळी राशन कार्डबाबत डी वन रजिस्टचे वाचन करण्यात आले. त्यातील अंत्योदय लाभार्थ्यांपैकी ९ लाभार्थी मयत आढळून आले. गाव नमुना १४ चे वाचन करण्यात आले असून गावातील विहिर व बोअरवेलच्या अचुक नोंदी घेण्यात आल्या. शेवटच्या टप्प्यात संजय गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थी यादीचे वाचन करण्यात आले. सर्व शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. अतिथींच्या हस्ते उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले. संचालन व आभार प्रदर्शन एकोडीचे तलाठी एस.एम. ठाकरे यांनी केले. कार्यक्रमासाठी कोतवाल दिलीप शहारे, दिलीप चौधरी, बंडू भुरे, शेषराव मेश्राम, प्रतिक कोटांगले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला एकोडी येथील ग्रामवासी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)