शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

शासकीय धान खरेदीला जिल्ह्यात आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यामध्ये गतवर्षी अनियमितता झाली नाही अशा शंभर केंद्रांना धान खरेदी मंजुरीचे आदेश देण्यात आले आहे. शेतकरी हिताचा विचार करून दिवाळीनंतर आवश्यक केंद्रांमध्ये आणखी वाढ होणार आहे. दिवाळीपुर्वी धान खरेदी सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथील धान खरेदी केंद्राचा शुभारंभ रविवारी होणार असून यानंतर जिल्ह्यातील इतर केंद्रांवरही धान खरेदी केंद्रांना प्रारंभ होणार आहे. धानाचे हमीभाव १,९४० रुपये असून याच दराने खरेदी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिवाळीपुर्वी धान खरेदी सुरू होणार की नाही अशी शंका असताना शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील शंभर केंद्रांना मंजुरीचा आदेश धडकला. त्यावरून रविवार ३१ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्राला प्रारंभ होणार आहे. साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथे रविवारी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते होणार आहे. धान खरेदी सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.गत महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या घरी हलक्या वाणाचा धान येवू लागला होता. मात्र धान खरेदी कधी सुरू होणार याची अनिश्चितता होती. भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नांना आता यश आले असून शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील १०० धान खरेदी केेंद्रांना मंजुरीचे आदेश देण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये गतवर्षी अनियमितता झाली नाही अशा शंभर केंद्रांना धान खरेदी मंजुरीचे आदेश देण्यात आले आहे. शेतकरी हिताचा विचार करून दिवाळीनंतर आवश्यक केंद्रांमध्ये आणखी वाढ होणार आहे. दिवाळीपुर्वी धान खरेदी सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथील धान खरेदी केंद्राचा शुभारंभ रविवारी होणार असून यानंतर जिल्ह्यातील इतर केंद्रांवरही धान खरेदी केंद्रांना प्रारंभ होणार आहे. धानाचे हमीभाव १,९४० रुपये असून याच दराने खरेदी केली जाणार आहे. मात्र अद्यापही शासनाकडून बोनस बाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. गतवर्षी ७०० रुपये बोनस दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. आता राज्य शासन बोनसची घोषणा केव्हा करणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दिवाळीपुर्वी धान खरेदी सुरू होत असली तरी शेतकऱ्यांना विकलेल्या धानाचा पैसा मात्र दिवाळीपुर्वी मिळण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांना आपला धान व्यापाऱ्यांनाच विकावा लागणार आहे. व्यापारी गत काही दिवसांपासून १५०० ते १६०० रुपये प्रती क्विंटल दराने धानाची खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. दिवाळी तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने आपला धान व्यापाऱ्यांना विकावा लागेल. मात्र धान खरेदीने अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासाही मिळणार आहे.

धान खरेदीत एसओपी ठरू शकते अडसर

-  आधारभूत धान खरेदी केंद्रावर संपूर्ण प्रिक्रिया स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरने (एसओपी) करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी या प्रणालीने खरेदी झाल्यास अनेक केंद्रांना फटका बसू शकतो. तुर्तास शंभर केंद्रांना परवानगी देण्यात आली असली तरी एसओपीमध्ये किती केंद्र नियमात बसतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.-  आधारभूत खरेदी केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचेच धान खरेदी केले जाणार आहे. जिल्ह्यातील जवळपास सव्वा लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड