इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना दिलासा : दहावीत जाण्याचा मार्ग मोकळा भंडारा: इयत्ता पहिलीपासून आठव्या वर्गापर्यत कोणत्याच विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण न करण्याच्या धोरणानंतर आता इयत्ता नववीच्या परीक्षेतही सर्वांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेवून एकप्रकारे 'ढकलपास' चा 'फतवा' शासनाने काढला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीच्या प्रमाणाला ब्रेक लागणार आहे.आपापल्या शाळांचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागावा, यासाठी अनेक शाळा अभ्यासात अप्रगत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नववीतच अनुत्तीर्ण करतात. यामुळे मात्र, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाणात वाढ झाल्याची दिसून येते. ही बाब लक्षात घेऊन नववीतील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण शून्यावर आणण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. पर्यायाने नवव्या वर्गातून अभ्यासात कमकुवत असणारे विद्यार्थ्यांना आता 'ढकलपास' या प्रकारामुळे दहाव्या वर्गाला प्रवेश मिळणार यात शंका नाही. नवव्या वर्गानंतर कुठल्याच विद्यार्थ्यांने शाळा सोडू नये, असे उद्दिष्ट शिक्षण विभागाने निश्चित केले असले तरी मुलांसह अनेक मुलं शाळा सोडत असल्याचे निदर्शनात आले आहे. जी मुले अभ्यासात मागे आहेत, त्यांना नववीतच अनुत्तीर्ण करण्याचे प्रकार कित्येक शाळांमधून होते. दहावीत हमखास उत्तीर्ण होतील, अशाच विद्यार्थ्यांना नववीत उत्तीर्ण केले जाते. हा प्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांना विशेष सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांकडून निकालानंतर ३० दिवसाच्या आत अभ्यासक्रम पूर्ण करून १० जुलैच्या आत पुर्नपरीक्षा घ्यावी आणि १० जुलैच्या आत निकाल जाहीर करावा. यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना २१ जुलैपासून दहावीच्या वर्गात बसविण्यात यावे अशा सूचना आहेत. उपाययोजना केल्यानंतरही ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण जास्त असेल, त्या शाळांची तपासणी करण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)इयत्ता नववीच्या परीक्षेत कुणालाही अनुत्तीर्ण न करण्याचा शासनाचा निर्णय हा योग्य आहे. महत्वाचे म्हणजेच त्यांची गळती होवू नये हा त्यामागील उद्देश आहे. शिक्षकांनी सुद्धा तसे त्यांचेकडे जबाबदारीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. या निर्णयाचा भंडारा जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ होणार असून, शासनाच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासंदर्भात सर्व शाळांना सूचित केले असून, विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात आली आहे. -किसन शेंडेशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद,भंडारापालकांमध्ये चिंतापहिलीपासून आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याचे निर्देश आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी पुरेसा अभ्यास करीत नाहीत. पर्यायाने ते अध्ययनाकडून दूर जात आहेत. त्यातच आता नव्याने नववीतही अनुत्तीर्ण न करण्याच्या निर्देशामुळे विद्यार्थी अभ्यासच करणार नाहीत.'ढकलपास' प्रकारामुळे दहावीपर्यंत कसेबसे खेचले जातील, मात्र तेथून पुढे काय, असा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. या निर्णयामुळे शिक्षकांसोबतच पालकांमधूनही शासनाच्या या निर्णयास विरोध होत असल्याचे दिसून येते.
'ढकलपास'चा शासनाचा फतवा!
By admin | Updated: April 16, 2016 00:26 IST