शेतकऱ्यांविषयी सत्ताधारी गप्प

By Admin | Updated: March 7, 2016 00:16 IST2016-03-07T00:16:34+5:302016-03-07T00:16:34+5:30

भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे दोन वर्ष पूर्ण झाले असले तरी शेतकऱ्यांसाठी योग्य ते धोरण नाही. केवळ घोषणांचा पाऊस सुरु असुन उद्योगपतींना मोठे करणारे सरकार...

Government chat about farmers | शेतकऱ्यांविषयी सत्ताधारी गप्प

शेतकऱ्यांविषयी सत्ताधारी गप्प

प्रफुल पटेलांचा सवाल : लाखनी, साकोली, लाखांदुरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा
लाखनी : भारतीय जनता पक्षाच्या सरकारचे दोन वर्ष पूर्ण झाले असले तरी शेतकऱ्यांसाठी योग्य ते धोरण नाही. केवळ घोषणांचा पाऊस सुरु असुन उद्योगपतींना मोठे करणारे सरकार आणि सत्तापक्षाचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांबाबद गप्प का, असा सवाल खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केला.
लाखनी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते.
यावेळी मंचावर माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, राकॉंचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, अविनाश ब्राम्हणकर, सभापती नरेश डहारे, शुभांगी रहांगडाले, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष धनु व्यास, सभापती दीपाली जांभुळकर, माजी सभापती अशोक चोले, दामाजी खंडाईत, जुल्फीकार हुमणे, विकास गभणे, बाळा शिवणकर, नूतन मेंढे, उर्मिला आगाशे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधीवर आरोप करीत अनेक समस्या जिल्ह्यात असताना कुणीही बोलत का नाही. केंद्राने सादर केलेला आर्थिक बजेट २००५ च्या आघाडी शासनाच्या काळातील बजेटशी तुलना केली असता एक रुपयाही त्यात वाढविला नाही. भेल प्रकल्पाबाबतही कुणी बोलत नाही. शासन सर्वांची फसवणूक करीत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गावागावांत जनजागृती करावी असे आवाहनही खा. पटेल यांनी केले. प्रास्ताविक डॉ. विकास गभणे, संचालन सुधन्वा चेटुले व आभार धनू व्यास यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

लाखांदुरात कार्यकर्ता मेळावा
लाखांदुर : येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी खा. प्रफुल पटेल, मधुकर कुकडे, सुनील फुंडे, सभापती राजेश डोंगरे, डॉ. वानखेडे, डोमेश वैद्य, तोमेश्वर पंचभाई, प्रभाकर सपाटे, नरेश दिवटे, बाळु चुन्ने, अ‍ॅड. मोहन राऊत, प्रियंक बोरकर, उदयभैय्या, न.प. सदस्य देवानंद नागदेवे, कल्पना जाधव, दीपक चिमणकर, वैशाली हटवार आदी उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले, सत्तेत असताना विकास कामासोबत सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार व शेतीपूरक व्यवसायाला बळ देण्यासाठी पाऊले उचलली होती. मात्र सत्ता परिवर्तन होताच सर्वसामान्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. शेतीकरिता येणारा उत्पन्न खर्च हा कमी झाला पाहिजे. शासनाने यासाठी ठोस पाऊल उचलावे असेही ते म्हणाले.(तालुका प्रतिनिधी)
शेतमालाला भाव निम्म्यावर
साकोली : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढले असे पंतप्रधान मोदी सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारख्या बराच सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. मात्र आजच्या भाजप सरकारने शेतमालाचे भाव निम्म्यावर आणून ठेवले आहे, असे मत खा. पटेल यांनी व्यक्त केले. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी हितगुज करतांना बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, सुनील फुंडे, सदाशिव वलथरे, नाना पंचबुध्दे, धनंजय दलाल, वसंतराव मानके, अविनाश ब्राह्मणकर उपस्थित होते. प्रास्ताविक उमेद घोडसे, तर संचालन टेंभरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Government chat about farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.