भाजीपाला व बागायतदार शेतकऱ्यांना अच्छे दिन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 05:00 AM2022-04-28T05:00:00+5:302022-04-28T05:00:43+5:30

महाराष्ट्र उन्हाने होरपळत असून विजेचे संकट गडद होत आहे. शेतकरी राजा अत्यल्प पाण्यात अधिक उत्पन्नासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र निसर्गाने आपले रूप बदलले असून मे महिन्याचे हेवी तापमान एप्रिल महिन्यातचं जाणवले आहे. यामुळे पारंपारिक अधिक पाण्याची पिके सुमार संकटात आले असून कमी पाण्याची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वळत आहे.  जिल्ह्यात केवळ २५ ते ३५ टक्के पर्यंत भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जात आहे.

Good day to vegetable and horticultural farmers! | भाजीपाला व बागायतदार शेतकऱ्यांना अच्छे दिन!

भाजीपाला व बागायतदार शेतकऱ्यांना अच्छे दिन!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : असह्य उन्हाळा सुरू आहे. भूजल पातळी खालावलेली आहे. धानाचा शेतकरी संकटात आहे. अशा संकटकाळात बागायती, भाजीपाल्याची शेती शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. गत वर्षभरापासून भाजीपाल्याला अच्छे दिन! दिसत आहेत. वांग्याला प्रति किलो ३० ते ३५ रुपयाचा दर मिळत आहे. एकरामागे शेतकऱ्याला लक्ष रुपयांचा नफा अपेक्षित मिळत आहे.
महाराष्ट्र उन्हाने होरपळत असून विजेचे संकट गडद होत आहे. शेतकरी राजा अत्यल्प पाण्यात अधिक उत्पन्नासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र निसर्गाने आपले रूप बदलले असून मे महिन्याचे हेवी तापमान एप्रिल महिन्यातचं जाणवले आहे. यामुळे पारंपारिक अधिक पाण्याची पिके सुमार संकटात आले असून कमी पाण्याची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वळत आहे. 
जिल्ह्यात केवळ २५ ते ३५ टक्के पर्यंत भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले जात आहे. उर्वरित क्षेत्रात इतर शेत पिके घेतले जातात. मात्र यात जोखीम व खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या पदरात अपेक्षित नफा पडताना दिसत नाही. भाजीपाल्याची शेती करणारा शेतकरी मात्र समाधानी असून दररोज नगदी आवक कुटुंबाचा उत्साह वाढविणारा ठरत आहे. 
जमिनीत सर्वच भाजीपाल्याची व बागायती ची पिके घेतले जातात. नगदी पिके समजले जाणारे उत्पन्न निश्चितच शेतकऱ्यांना समाधान देणारी ठरत आहेत. जिल्ह्यातील बागायतदार व भाजीपाला कसणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत असलेल्या दरानंतर समाधान व्यक्त होत आहे.

बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत बदल करावा. गत वर्षभराचा अभ्यास केल्यास प्रत्येकच भाजीपाल्यातील भाज्यांनी शेतकऱ्यांना चांगले भाव दिले आहेत. कमी पाण्याची शेती स्वीकारा. भाजीपाल्यासाठी २४ तास बीटीबी सब्जी मंडी सेवेत आहे.  
-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी भंडारा. 
धानापेक्षा तरी भाजीपाल्याची शेती परवडणारी आहे. केवळ ४५ दिवसात घरात नगदी आवक सुरू होते. तंत्रशुद्ध नियोजन केल्यास लक्ष रुपये एकराला नफा मिळण्यास अडचण नाही.
-दुर्गेश कांबळे, कारले उत्पादक,  खोलमारा 
मिरची पिकाला योग्य नियोजनाअंती सहजतेने लक्ष रुपये उरतात. एक मिरचीचा तोळा ६० ते ८० हजार रुपयांपर्यंत गेला. कमी पाण्यात अधिक उत्पन्नासाठी भाजीपाल्याची शेती निश्चितच फायद्याची आहे.
-अरुण पडोळे, मिरची उत्पादक पालांदूर. 
माझ्याकडे फळबाग आहे. कमी पाण्यात व्यवस्थित नियोजन होतो. एका एकराला लक्ष रुपयापेक्षा अधिक नफा मिळतो.
-पराग शांतलवार, शेतकरी  माडगी. 
 

 

Web Title: Good day to vegetable and horticultural farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.