हरदोलीत शेतकी खरेदी विक्रीचे 'गोडावून सील'

By Admin | Updated: November 26, 2015 00:38 IST2015-11-26T00:38:47+5:302015-11-26T00:38:47+5:30

स्थानिक शेतकी खरेदी विक्री समिती तुमसर अंतर्गत हरदोली (सि.) येथील आधारभूत केंद्रावर गतवर्षी शेतकऱ्यांकडून प्रत्येक पोत्यामागे एक किलो धान...

'Godavadi seal' for agricultural purchase in Harodoli | हरदोलीत शेतकी खरेदी विक्रीचे 'गोडावून सील'

हरदोलीत शेतकी खरेदी विक्रीचे 'गोडावून सील'

राहुल भुतांगे तुमसर
स्थानिक शेतकी खरेदी विक्री समिती तुमसर अंतर्गत हरदोली (सि.) येथील आधारभूत केंद्रावर गतवर्षी शेतकऱ्यांकडून प्रत्येक पोत्यामागे एक किलो धान अधिकचे घेवून ३०० पोती धानाचा अनाधिकृत साठा संस्थेच्या व्यवस्थापक व अध्यक्षांनी जमा केल्याची तक्रार प्राप्त झाली. त्या आधारे तहसिलदार व पुरवठा निरीक्षकांच्या प्रत्यक्ष पाहणीत ३०० पोती अंदाजे १७५ क्विंटल धान हा गोडावूनमध्ये अनाधिकृतरित्या आढळून आले. पंचनामा करून गोडावूनला सिल ठोकून धान जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ माजली.
सन २०१४-१५ च्या सत्रात हरदोली सिहोरा येथे तुमसर सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती तुमसर या संस्थेद्वारे धान आधारभूत केंद्र सुरू करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकांच्या मनमर्जी धोरणामुळे शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेला आधारभूत केंद्रावरील धान घेण्यास कुचराई करित होते. प्रती पोतीमागे एक किलो धान शेतकरी अधिक देत असेल तर त्यांच्याच धान खरेदी करित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रत्येक पोतीमागे १ किलो अनाधिकृत धान अधिकचे गोळा केले. त्या १ किलो धानाचे पर्यावसन ३०० बोरे धान म्हणजे अंदाजे १७५ क्विंटल अनाधिकृत धान जमा केले. ते धान गोडावूनमध्ये पडून ठेवलेला होते. एकीकडे संस्थेच्या रेकार्डला पुर्ण धान मिलर्सना दिल्याचे दाखविण्यात आले आहे. संस्थेच्या रेकार्डमध्ये धान शिल्लक नसल्याचे दाखविण्यात आली तर मग हे धान आले कुठून, असा सवाल उपस्थित करण्यात आला. संस्थेचे माजी अध्यक्ष रविदयाल पटले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात तक्रार नोंदवून दोषी अधिकारी व पदाधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्यासंदर्भात मागणी केली. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांना आदेश दिले असता त्या आदेशाची अंमलबजावणी करित तहसिलदार सोनवाने व पुरवठा निरीक्षक सुनिल लोहारे यांनी घटना स्थळाला भेट देवून तपासणी केली. तुमसर सहकारी शेतकी खरेदी विक्रीच्या हरदोली (सि.) येथील गोडावूनमध्ये ३०० बोरे अनाधिकृत धान आढळून आले. त्यानंतर गोडावूनला सिल ठोकून धान जप्त करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकांनी संस्थेच्या इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कारभार करित असल्याची चुणूक होती. मात्र अध्यक्ष व व्यवस्थापकांनी केलेले हे कार्य आपल्याही अंगलट येवू शकते, आपणही कुठेतरी फसु शकतो म्हणून संस्थेचे खुमन तुरकर, हरकसिंग मडावी, गिता राहांगडाले, रमेश बावणे, केसर पारधी, निलकंठ मोरे, सुखदेव रहांगडाले व शालिकराम भगत या आठही सदस्यांनी कारवाई होण्याआधीच राजीनामे सोपविल्याने प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.

Web Title: 'Godavadi seal' for agricultural purchase in Harodoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.