भगवंत नेहमी भक्तीच्या अधीन
By Admin | Updated: April 19, 2016 00:38 IST2016-04-19T00:38:13+5:302016-04-19T00:38:13+5:30
‘राम’नामात प्रचंड शक्ती आहे. या नामाच्या फक्त वापराने अथांग समुद्रात पाण्यावर दगड तरंगले होते.

भगवंत नेहमी भक्तीच्या अधीन
तुमसरात श्रीराम कथा : भक्तमाली महाराजांचे प्रवचन
भंडारा : ‘राम’नामात प्रचंड शक्ती आहे. या नामाच्या फक्त वापराने अथांग समुद्रात पाण्यावर दगड तरंगले होते. हनुमंतांची रामाप्रती असलेल्या भक्तीला जगात तोड नाही. भगवंत भक्तीच्या अधीन असून भगवंत हे भावग्रही आहेत. आपण भगवंतांचे प्रवचन करतो असे मानित असलो तरी स्व:त भगवंत भक्तांच्या कीर्तनात मग्न असतात, असे प्रवचन निकेश भक्तमाली महाराज यांनी केले.
तुमसर येथील श्री हनुमान रामायण मंडळ द्वारा आयोजित सात दिवसीय श्रीराम कथेचे द्वितीय पुष्प गुंफताना ते बोलत होते.
प्रभु विठ्ठलासंबंधी दृष्टांत देत निकेश भक्तमाली महाराज म्हणाले, पंढरपुरात जेव्हा संत नामदेवांना भगवंतांचे दर्शन झाले तेव्हा भगवंत ‘नामदेव-तुकाराम’ असे किर्तन करित होते. विश्वात गौैमातेचे रक्षण झाले पाहिजे.
आजघडीला कायद्याने यावर प्रतिबंध असले तरी गार्इंची हत्या केली जात आहे. ही खरंच निंदनीय बाब आहे. (प्रतिनिधी)
सत्संगाने मनाला शांती- पटोले
सत्संगात ईश्वर असतो, असे आपण ऐकत आलो आहे. आज त्याची अनुभूती मिळाली, ही एक आनंदाची बाब आहे. सत्संगातून मनाला शांती मिळते, असे अनुभवात्मक मत खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले. गौरक्षणासाठी आमचे कार्य निरंतर चालणार आहे. यावर केंद्र शासन गांभिर्याने लक्ष देऊन आहे, असेही पटोले म्हणाले. द्वितीय दिवसीय रामकथेला खा.पटोले यांनी उपस्थिती दर्शविली होती. यावेळी माजी खा. शिशुपाल पटले, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, माजी सभापती कलाम शेख, हिरालाल नागपुरे, सत्यनारायण तांबी, ललितकुमार थानथराटे, पंढरी धुर्वे, दीपक कावळे, कविता साखरवाडे आदी उपस्थित होते.