गोबरवाही आरोग्य उपकेंद्राची इमारत "एकांतवासात"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:07 IST2021-02-21T05:07:09+5:302021-02-21T05:07:09+5:30
गोवरवाही येथे रुग्णांच्या सोयीकरिता आरोग्य उपकेंद्राची इमारत ११ वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले होते. सुमारे ३० लाखांची इमारत असून ...

गोबरवाही आरोग्य उपकेंद्राची इमारत "एकांतवासात"
गोवरवाही येथे रुग्णांच्या सोयीकरिता आरोग्य उपकेंद्राची इमारत ११ वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आले होते. सुमारे ३० लाखांची इमारत असून ती गावाबाहेर कालव्याच्या पलीकडे एकांतवासात बांधण्यात आली. गावापासून अंतर दूर असल्याने येथे रुग्णांना जण्याकरिता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. एकांतवासात उपकेंद्र असल्याने महिला रुग्ण जाण्यास घाबरतात. टवाळखोर तरुणांचा येथे त्यांना सामना करावा लागतो. सदर इमारतीला जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मंजुरी देण्यात आली. कालव्यापलीकडे उपकेंद्र असून कालव्यातून रुग्णांना मार्गक्रमण करावे लागते.
गोबरवाही परिसरात २० ते२५ गावे येतात. त्यामुळे येथे रुग्णांची संख्या मोठी असते. सदर गाव मोठे असून केंद्रस्थानी आहे. उपकेंद्राची इमारत बांधकाम करताना ती गावाजवळ किंवा वसाहतीत करण्याची गरज होती. शासनाचे ३० लक्ष रुपये येथे खर्च करण्यात आले. परंतु सदर आरोग्य उपकेंद्र आता अडगळीत पडल्याचे दिसून येते.