शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

स्पर्धा परीक्षांना धैर्याने समोरे जा

By admin | Updated: November 13, 2016 00:23 IST

भारतीय प्रशासकीय सेवा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाासह विविध स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी ...

शांतनू गोयल : स्पर्धा परीक्षा कार्यशाळाभंडारा : भारतीय प्रशासकीय सेवा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाासह विविध स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी परिश्रमासोबतच धैर्य आणि संयमाची आवश्यकता असून अपयशाने खचून न जाता अंतिम ध्येय प्राप्त होईपर्यंत प्रयत्न करीत राहा, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परिक्षा अभ्यासिका मार्गदर्शन केंद्र सामाजिक न्याय भवन येथे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी हे होते. यावेळी गडचिरोलीचे आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डी.एन.धारगावे उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, स्पर्धा परिक्षा हे जीवनाचे वास्तव असून स्पर्धा परिक्षेचा बाऊ न करता आत्मविश्वासाने समोरे जा असा सल्ला दिला.स्पर्धा परिक्षा केंद्रासाठी आवश्यक ती सर्व मदत प्रशासन करणार असून मुलांनी जिद्दीने यशस्वी व्हावे. दर महिन्यांच्या दुसऱ्या शनिवारी यशस्वी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा ही सातत्य आणि संयमाची कसोटी आहे. कुठलाही विषय कायमचा समजून घेण्यासाठी वाचा. त्या विषयाबद्दल स्वत:ला व्यक्त होता येईल असे आकलन करा, संघर्षाची प्रक्रीया एन्जॉय करा असे दिवेगावकर यांनी सांगितले.उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी म्हणाले, स्वत:मधली क्षमता ओळखा व त्यानुसार प्रयत्न करा. ज्या क्षेत्रात अर्ज कराल त्या क्षेत्रातील उंचीची सेवा प्राप्त करण्याची जिद्द मनात ठेवा असे सांगितले. यावेळी तिनही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या कार्यशाळेला विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. संचालन प्रमोद गणवीर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)