राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकास साधणार
By Admin | Updated: February 22, 2016 01:04 IST2016-02-22T01:04:05+5:302016-02-22T01:04:05+5:30
अती मागास गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राजकारणाच्या पलीकडे जावून कार्य करण्याची इच्छाशक्ती असल्याची ग्वाही खा. नाना पटोले यांनी दिली.

राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकास साधणार
नाना पटोले यांची ग्वाही : सीतासांवगीत शेतकरी मेळावा
तुमसर : अती मागास गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राजकारणाच्या पलीकडे जावून कार्य करण्याची इच्छाशक्ती असल्याची ग्वाही खा. नाना पटोले यांनी दिली.
सीतासांवगी येथे मॉयल फाऊंडेशनच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेअंतर्गत बायफ- मित्रा संस्थेच्या सामूहिक विकास कार्याच्या महिला सशक्तीकरण व शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनापं्रसगी ते बोलत होते. यावेळी मॉयल लिमिटेडचे निर्देशक एम. पी. चौधरी, कार्यपाल निर्देशक दीपांकर सोम, कामगार संघटनचे जांभूळकर, तहसीलदार सोनवाने, शेखर कोतल्लीवार, जिल्हा परीषद सदस्या संगिता सोनवाने, संगिता मुंगुसमारे, शिशुपाल गौपाले, बाळकृष्ण गाढवे, तोफलाल रहांगडाले, उमा सेनकपाट, रमला कठौते, कविता बामचेर, दिलीप सोनवाने, ठाकचंद मुंगुसमारे आदी उपस्थित होते.
खा. पटोले म्हणाले, तालुका अतिमागास असल्याने तालुक्यातील बघेडा (गर्रा) हे गाव दत्तक घेतला आहे. या गावाचा विकास करण्याकरिता वर्षभरात ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. ग्रामस्थांना रोजगारभिमुख बनविणे हा मानस बाळगला असल्याचेही सांगितले. त्याच बरोबर मॉयलने दत्तक घेतलेल्या ११ गावात सिएसआर निधीचा योग्य वापर करुन शेतकऱ्यांना सिंचन, आदी व्यवस्थाही निर्माण करुन मूलभुत गरजा पुर्ण होणार असल्याचे सांगितले. मॉयल निर्देशक एम.पी. चौधरी व दिपांकर सोम यांनी मॉयलच्या उत्तरदायीत्व सामाजिक योजनेच्या निधीचा मॉयल परिसरातील ११ गावातील नागरिकांचे आर्थिक स्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीकोनातून संस्था बायफ कार्यरत आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती, नविन तंत्रज्ञान व शैक्षणिक स्तर उंचविण्याकरिता योग्य परिश्रम घेत आहेत. ज्या समस्या येतील त्या सर्वांचे निराकरण मॉयल प्रशासनातर्फे करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक बायफ संस्थेचे उपाध्यक्ष डि.एन. शिंदे यांनी केले. संचालन अभिजित हडोले यांनी केले. आभार प्रदर्शन मॉयलचे उपप्रबंधक किशोर चंद्राकार यांनी मानले. कार्यक्रमाकरिता चिखला मॉयलचे व्यवस्थापक विकास परिदा व चमू तसेच बायफ- मित्रा संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)