वाघिणीसह तीन शावक ठरले कोका अभयारण्याचे वैभव
By Admin | Updated: September 27, 2015 00:31 IST2015-09-27T00:31:37+5:302015-09-27T00:31:37+5:30
कोका वन्यजीव अभयारण्यातील अल्फा वाघीण व तिचे तीन शावक अभयारण्याचे वैभव ठरले असून त्यांना पाहण्यासाठी पर्यटक उत्सुक आहेत.

वाघिणीसह तीन शावक ठरले कोका अभयारण्याचे वैभव
रस्ता दुरुस्तीला वेग : १ आॅक्टोबरपासून अभयारण्य होणार खुले
युवराज गोमासे करडी (पालोरा)
कोका वन्यजीव अभयारण्यातील अल्फा वाघीण व तिचे तीन शावक अभयारण्याचे वैभव ठरले असून त्यांना पाहण्यासाठी पर्यटक उत्सुक आहेत. १ आॅक्टोबरपासून अभयारण्य पर्यटकांसाठी खुले होणार आहे. त्यादृष्टीने वन्यजीव प्रशासनाने तयारी केली असून जंगलातील रस्त्यांच्या दुरुस्तीला वेग आला आहे.
कोका वन्यजीव अभयारण्य ११० चौरास कि.मी. क्षेत्रात विस्तारला असून पाच तालुक्याच्या सीमेत कार्यक्षेत्र आहे. तीन वर्षापूर्वी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. नागझिरा व्याघ्र प्रकल्प असून वन्यजीवांची विविध येथे पहावयास मिळते. वनसंपदा व वनौषधींचे भंडार म्हणूनही या अभयारण्याला ओळख लाभत आहे. अल्फा नावाची वाघीण व तिचे तीन शावक पर्यटकांना आकर्षित करू पाहत आहेत. जैवविविधतेच्या दृष्टीने तृणभक्षक प्राण्यांमध्ये अस्वल, निलगाय, सांबर, हरिण, काळविट, चितळ, भेकरू, ससे, रानडुक्कर, निलगाय, रानम्हशी यांची संख्या वाढली आहे. हिंस्त्र प्राण्यांमध्ये वाघ, बिबट व कोल्ह्यांच्या अधिवासात भर पडली आहे. कोका अभयारण्य सुरु करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने हाचलाली सुरु केल्या आहेत. बौद्ध पौर्णिमेला मे महिन्यात झालेल्या वन्य प्राण्यांच्या प्रगणनेनुसार कोका अभयारण्यात १,५०० तृणभक्षक वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली होती. मोर, रानकोंबडे, रंग बिरंगी पक्षी आढळून आले. पर्यटकांच्या सुविधेसाठी थांबे बनविण्यात आलेले आहेत. वनांचे व प्राण्यांचे संवर्धन करता यावे यासाठी कुटी उभारून वनरक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. वन्यप्राण्यांची उन्हाळ्यात भटकंती होऊ नये, जंगलाबाहेर पडल्याने शिकारींची शक्यता लक्षात घेता ठिकठिकाणी बोअरवेल्स खोदून, सौरउर्जेने स्वयंसंचालित करण्यात आलेल्या आहेत पर्यटकांना जंगलाची संपूर्ण माहिती मिळावी म्हणून ११ गाईड नियुक्त करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली.
कोका अभयारण्य १ आॅक्टोबर रोजी पर्यटकांसाठी खुले होणार असून पर्यटकांच्यासाठी सुविधा उपलब्ध देण्याचे कामे अंतिम टप्प्यात आहे. अभयारण्यात अल्फा वाघीण व तिचे तीन शावक आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. मध्यंतरीच्या काळात डेंडू नावाचा वाघ बराच काळासाठी अभयारण्यात विसावला होता. मात्र आता तो नागझिऱ्यात परतला आहे.
- देवेंद्र कुंभारे, वनपरिक्षेत्राधिकारी,
वन्यजीव अभयारण्य कोका.