मेळाव्यातून व्यावहारिक, व्यापारी गुणांच्या विकासासाठी आनंद मेळावा
By Admin | Updated: February 22, 2016 01:05 IST2016-02-22T01:05:21+5:302016-02-22T01:05:21+5:30
विद्यार्थ्यांना दैनंदिन पुस्तकी ज्ञानाबरोबर व व्यापारी गुणांचे कौशल्य प्राप्त व्हावे, यासाठी आनंद मेळाव्यासारखे महत्वपूर्ण उपक्रम उपयोगी ठरतात.

मेळाव्यातून व्यावहारिक, व्यापारी गुणांच्या विकासासाठी आनंद मेळावा
सरिता चौरागडे यांचे प्रतिपादन : पालोरा शाळेत आनंद मेळावा
करडी (पालोरा) : विद्यार्थ्यांना दैनंदिन पुस्तकी ज्ञानाबरोबर व व्यापारी गुणांचे कौशल्य प्राप्त व्हावे, यासाठी आनंद मेळाव्यासारखे महत्वपूर्ण उपक्रम उपयोगी ठरतात. विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी यातून कळतात. स्पर्धेच्या युगात सर्वांनाच नोकरी मिळणे शक्य नाही. अशावेळी त्यांच्यात असलेला व्यापारी गुण त्यांना स्वयंरोजगार मिळवून देवू शकतो, प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सरिता चौरागडे यांनी केले.
जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वतीने आयोजित आनंद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्य पदार्थाची दुकाने लावली. ग्राहक आकर्षित होण्यासाठी आकर्षक सजावट केली. भाजीपाला खाऊची दुकाने, हरभरा, गांजर, पाणी पाऊच, पापड, लोणचा, उसळ, भेल, पाणीपुरी, उपमा पोहा, चटणी भाकर, झुणका भाकर आदी अन्य दुकाने मोठ्या प्रमाणात लावली होती. आनंद मेळाव्यासाठी ग्राहक म्हणून गावातील प्रतिष्ठीत मंडळी व पालकांना निमंत्रीत करण्यात आले होते. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भरभरून आस्वाद घेतला. भाजीपाला व अन्य उपयोग साहित्य घरच्यासाठी विकतही घेतली. आठवडी बाजाराप्रमाणे विविध वस्तुंची खरेदी विक्री यामुळे विद्यार्थ्यांना धंदेवाईक कौशल्य आत्मसात करता आले. सोबतच फसवणूक कशी होते.
ग्राहक मोलभाव करतात. उत्पन्न व खर्चाचा बजेट लावावा. वस्तुचे भाव बाजारनुसार करतेवेळी याचे प्रत्यक्ष अनुभव घेता आले. विद्यार्थ्यांच्या व्यावसायीक कौशल्याचे शिक्षक व पालकांनी भरभरून कौतुक केले. पुढीलवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन शाळेच्या वतीने करावे, अशी अपेक्षा पंचायत समिती सदस्य महादेव बुरडे यांनी व्यक्त केले.
शाळेत प्राचार्य सेवकराम हटवार यांनी आनंद मेळाव्याचे महत्व समजावून सांगितले. मेळाव्याचे उद्घाटन जि.प. सदस्या सारिका चौरागडे यांचे हस्ते, पं.स. सदस्य महादेव बुरडे यांचे अध्यक्षतेखाली झाले.
यावेळी अतिथी किरण भोयर, भोजराम तिजारे, युवराज गोमासे, रमेश ठक्कर, योगेश्वर चिंधालोरे, प्रकाश भोयर, प्राचार्य सेवकराम शेंडे, शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने हजर होते. प्रास्ताविक प्राचार्य शेंडे यांनी केली. संचालन शिक्षक संजय वासनिक तर आभार शिक्षक के.पी. माने यांनी मानले. (वार्ताहर)