वरठी पोलीस ठाण्याला जागा द्या

By Admin | Updated: September 11, 2016 00:37 IST2016-09-11T00:37:59+5:302016-09-11T00:37:59+5:30

वरठी येथील नवनिर्मित पोलीस ठाण्यासाठी गट क्र. ४८३/१ ही ०.४४ हेक्टर शासकीय जागा देण्यात यावी,...

Give place to Worli police station | वरठी पोलीस ठाण्याला जागा द्या

वरठी पोलीस ठाण्याला जागा द्या

धरणे आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन 
भंडारा : वरठी येथील नवनिर्मित पोलीस ठाण्यासाठी गट क्र. ४८३/१ ही ०.४४ हेक्टर शासकीय जागा देण्यात यावी, या मागणीसाठी महिला अत्याचार विरोधी सामाजिक न्यायमंच भंडाराच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
सन २०१२ पासून या जागेच्या मागणीसाठी शासनाला मागणी करण्यात येत आहे. ही जागा मिळावी म्हणून बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी मोहाडीचे तहसीलदार सुर्यवंशी यांनी उपोषण मंडळात येऊन आश्वासन दिले होते. जाहीरनामा सुद्धा काढला. त्या जाहिरनाम्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी वरठी पोलीस ठाण्याच्या उद्घाटन प्रसंगी जागा मिळवून देण्याची घोषणा केली होती. या गट क्रमांकाची जागा वरठी पोलीस ठाण्याला देण्यात येणार होती. परंतु अजूनपर्यंत ती जागा मिळालेली नाही. वरठी पोलीस ठाणे भाड्याच्या ठिकाणी असून आरोपींना ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही. पोलिसांना बसण्यासाठी व्यवस्था नाही. तक्रारकर्त्यांना गैरसोयीचे आहे. अशा परिस्थितीत नवीन ठिकाणी ईमारतीचे बांधकाम व्हावे, यासाठी महसूल विभागाकडून रिकामी असलेली जागा मागण्यात आली आहे. जनतेसाठी सेवा देणाऱ्या पोलीस विभागाला महसूल विभागाकडून जागा मिळत नसेल तर सामान्य जनतेचे कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या जागेच्या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करीत महसूल निवासी जिल्हाधिकारी विजया बनकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महिला अत्याचार विरोधी सामाजिक न्यायमंचाचे संस्थापक विष्णूदास लोणारे, सचिव त्रिवेणी वासनिक, सूरज परदेशी, बळीराम सार्वे, शरद कढव, कन्हैय्या नागपुरे, ज्ञानेश्वर निकुरे, कविता लोणारे, द्रोपदा टेंभुर्णे यांनी निवेदन दिले असून माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी धरणे आंदोलन ठिकाणी भेट देऊन निवेदन स्वीकारून या जागेसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Give place to Worli police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.