सरसकट मदत द्या
By Admin | Updated: November 22, 2015 00:31 IST2015-11-22T00:31:59+5:302015-11-22T00:31:59+5:30
केवळ पैसेवारी न बघता किडीमुळे झालेले नुकसान लक्षात घेवून भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, ....

सरसकट मदत द्या
भंडारा : केवळ पैसेवारी न बघता किडीमुळे झालेले नुकसान लक्षात घेवून भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रेम वनवे, नीलकंठ (बालुभाऊ) कायते यांनी केली आहे.
प्रामुख्याने धान उत्पादक असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ८० टक्के जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. यंदा शासनाने उभ्या धानपिकाची पैसेवारी ६२ पैसे काढल्याने दुष्काळग्रस्त यादीतून जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. प्रत्येक्षात मात्र पाऊस व्यवस्थीत पडला असला तरी विविध कीड व रोगांच्या प्रादुर्भावाने धानपिके उध्वस्त झालेले आहे. धानपिकावर रोगांचे आक्रमण झाल्याने धानाची लोंबी खाली गळून पडत आहे. शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी धानही मिळणार नाही आणि जनावरांसाठी चाराही राहणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय ठरलेल्या शासनाने संवेदनशील होवून जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)