सिंचनासाठी कालव्याचे पाणी द्या

By Admin | Updated: August 28, 2016 00:23 IST2016-08-28T00:23:42+5:302016-08-28T00:23:42+5:30

गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालाव्यातून पाणी वाहत असताना शेतातील पिकांना त्याचा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.

Give irrigation water for irrigation | सिंचनासाठी कालव्याचे पाणी द्या

सिंचनासाठी कालव्याचे पाणी द्या

बाळा काशिवार यांचे निर्देश : हयगय करणाऱ्यांविरुद्ध होणार कारवाई
लाखांदूर : गोसीखुर्द धरणाच्या डाव्या कालाव्यातून पाणी वाहत असताना शेतातील पिकांना त्याचा उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. आ. बाळा काशिवार याांनी गोसे धरणाच्या अधिकाऱ्यांना गवराळा येथे बोलावून परिस्थिती समजून घेत अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कारभारावर ताशेरे ओढले. तसेच सिंचनासाठी प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालेच पाहिजे, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
संपूर्ण चौरास भागात डाव्या कालव्याचे जाळे पसरले आहे. अपुऱ्या पावसामुळे धानपीक करपू लागले अशातच गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यातुन पाणी सोडण्यात आले. मुख्य कालव्याला जोडून उप कालवे व गेटचे अर्धवट बांधकाम असल्याने शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळणे कठीण झाले. मिळेल त्या दिशेने गरज नसताना पाणी वाहून जात आहे. अशातच पाणी असून पाणी मिळत नसल्याने शेतकरी जाम वैतागले आहेत. याची आमदार काशिवार यांना देण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्याला प्राधान्य देत गवराळा गावाला भेट देत गोसे खुर्द धरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्या एकूण घेतल्या. यावेळी कालव्याचे पाणी शेतात येत नाही, उपकालव्याचे सदोष बांधकाम, विद्युत वितरण विभागाच्या चुकीचे धोरण, वीज जोडणीची विलंबता, नादुरूस्त जनित्र, अवेळी होणारे भारनियमन, वीज जोडणीसाठी अवाजवी डिमांड यातून योग्य मार्ग काढण्याची विनंती शेतकऱ्यांनी केली. प्रत्यक्ष वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर बोलून कमी डिमांड भरून शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले.
धानपीक करपणार नाही याची काळजी घेत सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आ. बाळा काशिवार यांनी यावेळी दिल्या. जिल्हा परिषद सदस्य प्रणाली ठाकरे, सभापती मंगला बगमारे, नूतन कांबळे, विनोद ठाकरे, विलास तिघरे, प्रकाश राऊत, पंचायत समिती सदस्य अल्का मेश्राम, शिवाजी देशकर, प्रदीप बुराडे, प्रमोद ढोरे, तहसीलदार तोडसांम, खंडाविकास अधिकारी देवरे, गोसेखूर्द धरणाचे वरिष्ठ अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Give irrigation water for irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.