घरकूल योजनेचा लाभार्थ्यांना घरे द्या
By Admin | Updated: August 14, 2015 00:07 IST2015-08-14T00:07:15+5:302015-08-14T00:07:15+5:30
आदिवासींचा विकास व्हावा म्हणून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना झाली आहे.

घरकूल योजनेचा लाभार्थ्यांना घरे द्या
वरिष्ठांना निवेदन : राजेंद्र पटले यांचे प्रतिपादन
भंडारा : आदिवासींचा विकास व्हावा म्हणून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना झाली आहे. परंतू या कार्यालयात बसलेले अधिकारी बेचाऱ्या गरीब आदिवासींची व्यथा सुद्धा ऐकत नाही. निव्वळ निवेदन स्विकारतात व २-२ वर्ष त्या निवेदनावर लक्ष सुद्धा देत नाही.
ओळख वाल्यांचा काम होतो, परंतु ज्याचा कुणीच नाही, त्याला धुतकारतात असाच एक नेत्रहिन असलेला व्यक्ती महेश मनोहर उईके रा. कारली पो. बघेडा ता. तुमसर यांनी दि.२१ आॅक्टोबर २०१३ ला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भंडारा येथे निवेदन दिले आहे. या गरीब नेत्रहिन व्यक्तीची केश अजून पर्यंत मंजूर झालेली नाही. ही शोकांतिका आहे, जर या केशमध्ये काही त्रृट्या असत्या तर त्रृट्या पूर्ण करण्यासाठी बोलावले असते परंतु असे काहीच केले नाही.
जर अशी गरीब अपंग व्यक्ती सोबत हे वरील अधिकारी अशा प्रकारे व्यवहार करीत असतील तर अशा अनेक आदिवासी बांधवांना कसा त्रास देत असतील. गरीब नेत्रहिन व्यक्तीची केश मंजूर न होणे आश्चर्य वाटते. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजेंद्र पटले यांनी निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)