‘त्या’ कुटुंबांना पाच लाखांची मदत द्या

By Admin | Updated: August 30, 2014 23:27 IST2014-08-30T23:27:29+5:302014-08-30T23:27:29+5:30

जिल्ह्यातील नअ‍ेक गावात डेंग्यू आजाराचा उद्रेक झाला असून अनेक रुग्ण तापाने फणफणत आहेत. डेंगू या रोगामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. मृत्यू पावणारे सर्व रुग्ण हे गरीब

Give five lakh rupees to those families | ‘त्या’ कुटुंबांना पाच लाखांची मदत द्या

‘त्या’ कुटुंबांना पाच लाखांची मदत द्या

भंडारा : जिल्ह्यातील नअ‍ेक गावात डेंग्यू आजाराचा उद्रेक झाला असून अनेक रुग्ण तापाने फणफणत आहेत. डेंगू या रोगामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. मृत्यू पावणारे सर्व रुग्ण हे गरीब कुटूंबातील असल्यामुळे व ज्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर रुग्णांचे घर संकटात येत आहेत. अशा सर्व नागरिकांना शासनाने त्वरीत मुख्यमंत्री शासकीय निधीतून प्रत्येकी पाच लाख रूपयांची शासकीय मदत करण्यात यावी, अशी मागणी आहे. आतापर्यंत या आजारावर कुठल्याही प्रकारची उपाय योजना शासनाकडे नाही.
रुग्णांचे रक्ताचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्या अहवालावरून त्यांचा मृत्यु नेमका कशाने झाला, हे स्पष्ट होतो. जिल्ह्यातील अनेक रुग्ण विविध रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. पावसाच्या पाण्याचे प्रमाण कमी जास्त प्रमाणावर पाणी पडत असून हिवताप सारखे अनेक साथीचे आजार होत आहेत.
अनेक ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे त्यावर डेंग्यु या रोगाच्या अळी तयार होतात व त्या अळींपासून डेंग्यूचा मच्छरांची पैदास होते. हा मच्छर मनुष्याला चावल्यास डेंग्यू या रोगाची लागण होते. परंतु रोगावर कुठल्याही प्रकारची प्रतिबंधात्मक लस किंवा उपाययोजना नसल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. जिल्ह्यात डेंग्यू या रोगाने एकूण ८ रुग्णांचा बळी घेतला आहे. अजून संशयीत ६ रुग्णांची तपासणी रीपोर्टींसाठी पाठविण्यात आले आहेत. ठिकठिकाणी १०० पेक्षा जास्त लोक साथीच्या आजाराने शासकीय तथा निमशासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सदर मागणीचे निवेदन युवाशक्तीचे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत भोयर, शहर अध्यक्ष प्रमोद वावधने, जागेश्वर समर्थ, संघदीप डोंगरे, विजय क्षीरसागर, सुशिल सोमनाथे, दिपक डोकरीमारे, राकेश शामकुंवर, पंकज सुखदेवे, शुभम धुमनखेडे, मयुर मासूरकर, समीर खान, अनु शेख, मनीष पांडे, विनीत भक्ते, एकनाथ डोरले, राकेश अंबोने आदींनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Give five lakh rupees to those families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.