'त्या' कामगारांना समान वेतन द्या
By Admin | Updated: August 11, 2016 00:29 IST2016-08-11T00:29:05+5:302016-08-11T00:29:05+5:30
अशोक लेलँड येथील कार्यरत कंत्राटी कामगारांना स्थायी कामगारांएवढे वेतन व इतर भत्ते मिळावे ...

'त्या' कामगारांना समान वेतन द्या
आयुक्तांना निवेदन : जिल्हा कामगार संघाची मागणी
भंडारा : अशोक लेलँड येथील कार्यरत कंत्राटी कामगारांना स्थायी कामगारांएवढे वेतन व इतर भत्ते मिळावे यासाठी भंडारा जिल्हा (इंजि.) कामगार संघातर्फे सहायक कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
यावेळी कामगार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पंचबुद्धे, लेलँड प्लाँट कार्यपालन समिती सदस्य पुरूषोत्तम नन्होरे, संजय कोचे, सुभाष गजभिये, विकास रामटेके, नितीन बुरडे, संजय बडोले, विनोद वाढई, भुपेष नंदेश्वर, सतीश लांजेवार, शेषराव हटवार यांच्यासह अन्य कामगार उपस्थित होते.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कंत्राटी कामगार स्थायी कामगारांच्या परिभाषेत आहेत. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कामगारांना त्यांच्या न्यायापासून वंचित व्हावे लागत आहे. कंपनीमध्ये स्थायी कामगार जे काम करतात तेच काम कंत्राटी कामगार मागील १५ ते २० वर्षांपासून करीत आहे. या उद्योगासाठी राज्य शासन निर्णयाप्रमाणे, आस्थापनेमध्ये स्थायी कामगार व कंत्राटी कामगार यांच्या कामाचे स्वरूप एक असेल तर त्या कंत्राटी कामगारांना स्थायी कामगाराएवढे वेतन व इतर भत्ते देणे कंपनी व्यवस्थापनाला बंधनकारक आहे. औद्योगिक विवाद अधिनियम १९४७ च्या कलम ३३ (१) प्रमाणे वसुली दावा प्रकरण, कंत्राटी कामगारांना स्थायी कामगाराएवढे वेतन, इतर भत्ते देण्याबाबत १० जून २०१४ चा शासन परिपत्रक आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी कामगारांएवढे वेतन देण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा इंजि. कामगार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पंचबुद्धे व प्रसिद्धी प्रमुख संजय बडोले यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)