शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वेगळा विदर्भ द्या, अन्यथा चालते व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:24 IST

स्वतंत्र विदर्भासासाठी टाळाटाळ केली जात असून सत्ताधारी गांभिर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे विदर्भाच्या विरोधकांनी वेगळा विदर्भ द्यावे, अन्यथा विदर्भातून चालते व्हावे.

ठळक मुद्देपत्रपरिषद : विदर्भ राज्य आंदोलन समिती पदाधिकाऱ्यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : स्वतंत्र विदर्भासासाठी टाळाटाळ केली जात असून सत्ताधारी गांभिर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळे विदर्भाच्या विरोधकांनी वेगळा विदर्भ द्यावे, अन्यथा विदर्भातून चालते व्हावे. येत्या १ मे ला होऊ घातलेल्या नागपूर विधानभवनावर ''विदर्भाचा झेंडा लावण्याच्या आंदोलनात'' हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूर येथे पत्रपरीषदेतून केले आहे.यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रण राम नेवले, कोअर कमेटी मोरेश्वर बोरकर, जिल्हाध्यक्ष वासुदेव नेवारे, महिला अध्यक्ष पौर्णिमा भिलावे, महिला अध्यक्ष ममता ढोके, तालुकाध्यक्ष विश्वपाल हजारे, महिला अध्यक्ष वर्षा मेंढे, महिला अध्यक्षा अ‍ॅड.नंदा पराते, विजया धोटे, संदीप लोणारे, तालुका सचिव चंद्रशेखर खेडीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.सत्तेत येण्यापुर्वी वेगळा विदर्भ करू असे सांगत सत्तेत आलेल्या भाजप सरकारने आता वेगळ्या विदर्भावर मौन धारण केले आहे. त्यांनी वैदर्भीय जनतेची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, भारनियमन, शेतमालाला हमी भाव देण्याचे आश्वासन आता हवेत विरले आहेत. या आश्वासनाच्या उत्तरासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे वेगळा विदर्भ राज्य करणे आहे.५ डिसेंबर २०१५ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. पाच हजार लोकांना अटक केली, ९ आॅगस्ट २०१६ ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर २० हजार लोकांचा मोर्चा नेला तरी देखील ते बोलले नाही. त्यानंतर ५ डिसेंबर २०१७ ला विधानभवन नागपूर येथे २५ हजार विदर्भवादी व शेतकºयांनी मोर्चा नेला असता सरकार निवेदन घ्यायलाही तयार नाही, म्हणून ११ जानेवारी २०१७ ला संपूर्ण विदर्भभर ८५ ठिकाणी रस्ता रोको चक्का जाम आंदोलन केले. ११ डिसेंबर २०१७ ला विदर्भ बंद आंदोलन झाले. मात्र या सरकारला व ज्यांनी स्वतंत्र विदर्भाचे व शेतकºयांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते त्या लोकप्रतिनिधींना सुद्धा जाग येत नाही.विदर्भात ३६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या व रोज शेतकरी मरत आहेत. गेल्या तिन वर्षापासून विदर्भातील १० ही खासदारांनी वैदर्भीय जनतेच्या मागणीनुसार प्रधानमंत्र्यांकडे विदर्भातील शेतकºयांच्या समस्या सोडविण्यासाठी विदर्भ राज्य बाबद साकडे घालून बाध्य करायला पाहिजे होते. मात्र एकही खासदार बोलले नाही. त्यामुळे सर्व खासदारांचे टप्प्या-टप्प्याने राजीनामे मागण्यात येत आहेत.नोटबंदीमुळे तीन लाख लहान मोठे उद्योग बंद झाले. त्यामुळे २ कोटी तरुणांच्या असलेल्या नोकºया गेल्या व राज्य सरकार ३० टक्के नोकऱ्या कमी करणार आहे. जीएसटीमुळे व्यापारी वर्ग प्रचंड दहशतीत आहे. त्यामुळे महागाई वाढली आहे.या सर्व सरकारच्या विरोधी धोरणाचा विरोध करून स्वतंत्र विदर्भासाठी १ मे ला महाराष्ट्र दिनाचा निषेध करून नागपूरच्या विधान भवनावर विदर्भाचा झेंडा लावण्यासाठी मार्च काढण्यात येणार आहे. आता नागपूरला महाराष्ट्र राज्याची विधानसभा भरणार नाही तर विदर्भ राज्याची विधानसभा भरेल, असा विश्वास पत्रपरिषदेत दिला.