विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र त्वरित द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:53+5:302021-02-05T08:41:53+5:30

भंडारा : भंडारा शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आवश्यक असते. मात्र विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र ...

Give caste certificates to students immediately | विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र त्वरित द्या

विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र त्वरित द्या

भंडारा :

भंडारा शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आवश्यक असते. मात्र विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र एसडीएम कार्यालयामार्फत उशिरा प्राप्त होत असल्याने तसेच समाजकल्याण विभागाने शिष्यवृत्ती देयके सादर करण्यासाठी कमी कालावधी दिल्याने विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र त्वरित उपलब्ध करून द्यावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

सन २०२०-२१ मध्ये भारत सरकारची इतर मागास प्रवर्गात शिष्यवृत्ती देयके सादर करण्यासंदर्भात जिल्हा समाजकल्याण विभागाने अत्यंत कमी कालावधी उपलब्ध करून दिला आहे. सदर कालावधीत देयके सादर करण्यासाठी अधिनस्त उपविभागीय कार्यालयावर जातीचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना लवकर मिळत नसल्याची ओरड आहे. त्यामुळेच सदर जातीचे दाखले विद्यार्थ्यांना त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर निर्देश देण्यात यावे, अशी मागणीही अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाने केली आहे.

दरम्यान तसेच यासंदर्भात समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांनी शिष्यवृत्ती देयकासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संघाचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर दमाहे, रमेश सिंगनजुडे, केशव बुरडे, श्रावण लांजेवार, सुनील निनावे, विजय चाचेरे, संजय झंझाड, संजय आजबले, दुर्गादास भड, आदेश बोंबार्डे, मंगेश नंदनवार, विनय धुमनखेडे, विलास तिडके, हरिश पवार, सचिन लिखार, विकास गायधने, किशोर ईश्वरकर, मुलचंद वाघाये, दिलीप ब्राह्मणकर, देवराम थाटे, विलास टिचकुले, सुरेश कोरे, नरेंद्र रामटेके, योगेश पुडके, अरुण बघेले, बाळकृष्ण भुते, संजय नंदेश्वर, रषेश फटे, यशपाल वाघमारे, हरिदास धावडे, नरेश शिवरकर आदी शिक्षक उपस्थित होते. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे यांना देण्यात आले.

Web Title: Give caste certificates to students immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.