योजनांचा लाभ प्रत्येक गरजूंना द्या
By Admin | Updated: March 4, 2017 00:26 IST2017-03-04T00:26:15+5:302017-03-04T00:26:15+5:30
राज्य शासनाच्या योजना समाजातील प्रत्येक माणसांपर्यत पोहोचून त्या योजनांचा लाभ प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे.

योजनांचा लाभ प्रत्येक गरजूंना द्या
बाळा काशिवार : लाखांदूर पंचायत समितीची आमसभा
लाखांदूर : राज्य शासनाच्या योजना समाजातील प्रत्येक माणसांपर्यत पोहोचून त्या योजनांचा लाभ प्रत्येक गरजू लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. योजनांचा लाभ देताना काही अधिकारी व कर्मचारी लाभार्थ्यांची लुबाडणूक करीत असतात, सामान्य जनतेशी होणारा असा प्रकार खपवून घेणार नसल्याचा गर्भित इशारा आमदार बाळा काशिवार यांनी दिला. लाखांदूर पंचायत समितीच्या आमसभेत ते बोलत होते.
लाखांदूर तालुक्यातील विविध कामांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आयोजित आमसभेच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळा काशिवार होते. तर मंचावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड.वसंता एंचिलवार, जिल्हा परिषद सदस्या माधुरी हुकरे, पंचायत समिती सभापती मंगला बगमारे, खंडविकास अधिकारी डी.एम.देवरे, , नगराध्यक्षा नीलम हुमने, पंचायत समिती सदस्य कुंडलिक पेलने, शिवाजी देशकर, नेहा बगमारे, तृप्ती मातेरे, कांता मेश्राम, नगर परिषद गटनेता विनोद ठाकरे, नगरसेवक हरीष बगमारे, नायब तहसीलदार विजय कावळे, राधेश्याम मुंगमोडे हे उपस्थित होते. या सभेमध्ये सन २०१६-१७ वर्षात विविध योजनेअंतर्गत कामाचा आढावा घेण्यात आला. त्यात क्रुषी विभाग, आरोग्य विभाग, वन विभाग, महसुल विभाग, भुमी अभिलेख, विद्युत विभाग, पंचायत व समाजकल्यान विभाग, राष्ट्रीय ग्रामिण जिवनोन्नती अभियान, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, पशु संवर्धन, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा, बांधकाम विभाग, मग्रारोहयो या योजनांचा समावेश होता. त्यानंतर सन २०१७-१८ मध्ये करावयाच्या कामाची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी जनतेनी योजनांचा लाभ घेताना अधिकारी वर्गाकडून येणाऱ्या अडचणी सांगितल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. कृषी विभाग व बचत गटामार्फत वितरीत करण्यात आलेले साहित्य लाभार्थ्यांकडे उपलब्ध नसल्याचे दिसुन आले. प्रास्ताविक खंडविकास अधिकारी डी.एम. देवरे यांनी केले. संचालन सुरेश लंजे यांनी केले. कार्यक्रमासाठी मेळे, करंजेकर, हेडाऊ, टि.बी. अंबादे, योगेश कुटे, संजय लांजेवार पंचायत समितीचे कर्मचारी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व नागरीक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)