मुलींनी जबाबदारी, भूमिकेची जाण ठेवावी
By Admin | Updated: September 26, 2015 00:38 IST2015-09-26T00:38:56+5:302015-09-26T00:38:56+5:30
युवतींना किशोरवयात होणारे शारीरिक, मानसिक व लैंगिक समस्या भेडसावतात.

मुलींनी जबाबदारी, भूमिकेची जाण ठेवावी
मार्गदर्शन : मीरा भट यांचे प्रतिपादन
भंडारा : युवतींना किशोरवयात होणारे शारीरिक, मानसिक व लैंगिक समस्या भेडसावतात. त्यामुळे युवतींनी वयात आल्यानंतर जबाबदारी व भूमिका याची जाण ठेवावी, असे प्रतिपादन मीरा भट यांनी व्यक्त केले.
किशोरवयीन मुलींना वाढत्या वयात येणाऱ्या अडचणी त्यावर उपाययोजना यावर युवा रुरल असोसिएशन व लायन्स क्लब तुमसरच्या वतीने एस. जी. महिला महाविद्यालयात मार्गदर्शन शिबिराचे बुधवारला आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला महिला विकास परिषदेच्या विदर्भ अध्यक्ष मीरा भट, जिल्हा समन्वय मृणाल मुनिश्वर, सरिता रहांगडाले, प्राचार्य युवराज सेलोकर, प्रा. डॉ. कनिजबानो कुरेशी, प्रा. मीनाक्षी बेसेकर, प्रा. प्रमिला हरडे, प्रा. डॉ. कल्पना राऊत, उडवाला मेश्राम, नीर सक्सेना, सीता चौरागडे आदी उपस्थित होत्या.
यावेळी मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला १५० महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या. दरम्यान, किशोरवयात येणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांना दूर करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक सरिता रहांगडाले तर आभार कृंदा वैद्य यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)