बालिकेला ट्रकने चिरडले

By Admin | Updated: January 24, 2015 00:14 IST2015-01-24T00:14:09+5:302015-01-24T00:14:09+5:30

शाळेतील वार्षिकोत्सव बघून घरी परतणाऱ्या अडीच वर्षीय बालिकेला ट्रकने चिरडले. वैष्णवी बिंदा कश्यप असे या मुलीचे नाव आहे.

The girl crushed the truck | बालिकेला ट्रकने चिरडले

बालिकेला ट्रकने चिरडले

भंडारा : शाळेतील वार्षिकोत्सव बघून घरी परतणाऱ्या अडीच वर्षीय बालिकेला ट्रकने चिरडले. वैष्णवी बिंदा कश्यप असे या मुलीचे नाव आहे. ही घटना गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर बेलाजवळ घडली.
बेला येथे राष्ट्रीय महामार्गावरील महर्षि विद्या मंदिर शाळेचा वार्षिकोत्सव सुरू आहे. यामध्ये गुरूवारी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम बघण्यासाठी विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. शाळेसमोरच घर असल्याने बेला येथील अडीच वर्षीय वैष्णवी ही बहिणीसोबत कार्यक्रम बघायला गेली होती. कार्यक्रम आटोपल्यानंतर ती घरी परतत असताना रस्ता ओलांडत होती. यावेळी भरधाव ट्रकने (एमएच ३६-१६३५) ने तिला चिरडले.
यात वैष्णवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच नागरिकांनी घटनास्थळ गाठून ट्रक चालकाला बेदम चोप दिला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक जमशेद अमीनुद्दीन अंसारी (रा.वरठी) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून अटक केली. शुक्रवारी जमशेदला न्यायालयाने त्याची ६ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The girl crushed the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.