राजपत्रित अधिकारी संघटनेचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:23 IST2017-11-04T00:23:32+5:302017-11-04T00:23:42+5:30
पंचायत समिती पदाधिकाºयांच्या जाचक त्रासामुळे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पचांयत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर वाघ यांनी, कार्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

राजपत्रित अधिकारी संघटनेचे कामबंद आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पंचायत समिती पदाधिकाºयांच्या जाचक त्रासामुळे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पचांयत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर वाघ यांनी, कार्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून महाराष्टÑ विकास सेवा राजपत्रित वर्ग १ व वर्ग २, च्या अधिकाºयांनी शुक्रवारला कामबंद आंदोलन करुन घटनेचा निषेध नोंदविला.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांनी सभापती, उपसभापती व इतर पदाधिकारी हे अपमानास्पद वागणूक देत असल्याने दोन दिवसांपूर्वी या अपमानास्पद जाचक त्रासाला कंटाळून गट विकास अधिकारी वाघ यांनी, पंचायत समितीची मासिक सभा सुर असताना विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्नकेला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले, जि.प. भंडारा महाराष्टÑ विकास सेवा राजपत्रित अधिकारी वर्ग १ व वर्ग २ शाखा, यांनी आज शुक्रवारला समाज कल्याण विभागाच्या आवारता काम आंदोलन करुन निषेध नोंदविला. याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. कामबंद आंदोलनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), मंजुषा ठवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा), दिघे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डी.पी. सपाटे जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे, गट विकास अधिकारी (नरेगा) खोब्रागडे, भंडारा गट विकास अधिकारी तामगाडगे व जिल्ह्यातील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सहभागी होते.