Gaudbengal in Sakoli of fire vehicle | अग्निशमन वाहनाचे साकोलीत गौडबंगाल

अग्निशमन वाहनाचे साकोलीत गौडबंगाल

ठळक मुद्देनगरपरिषद : रजिस्ट्रेशन झाले पण वाहन पोहचलेच नाही

संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : अग्निशमन दलाच्या वाहनासाठी साकोली नगरपरिषदेत मोठे राजकारण झाले. वादविवाद झाले. एवढेच नाही तर नगराध्यक्षावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्नही केला. नगराध्यक्ष रजेवर गेल्या. मात्र अग्निशमन दलाचा वाहनाचा घोळ सुटता सुटेना. लॉकडाऊन असताना या वाहनाचे आरटीओ कार्यालयातून रजिस्ट्रेशन झाले. मात्र तरीही वाहन अद्यापपर्यंत साकोलीत पोहोचलेच नाही. त्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन चोरीला तर गेले नाही ना? असा प्रश्न साकोली वासीयांना पडला आहे.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर साकोली ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषदेत झाले. त्यामुळे शहराचा कायापालट होईल असे वाटत होते. निवडणुका पार पडल्या. भाजपाची एक हाती सत्ता आली. सुरुवातीचे काही दिवस सर्वकाही आलवेल होते. मात्र विधानसभेच्या निवडणूक पार पडताच अध्यक्ष विरुध्द नगरसेवक युध्द सुरु झाले. सुरुवातीला नगराध्यक्ष धनवंता राऊत या नगरसेवक व समिती सभापतींना विश्वासात न घेता काम करतात, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. नंतर नगरपरिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या अग्निशमन दलाच्या वाहन खरेदीत घोळ झाल्याचा आरोप सुरु झाला. यावरही नगरसेवक थांबले नाही. त्यांनी नगराध्यक्षावर अविश्वास आणण्याचा हालचाली सुरु केल्या.
याप्रकरणाची दखल घेत आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार बाळा काशीवार यांनी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांची एक बैठक घेतली. मात्र त्याही बैठकीत तोडगा निघाला नाही. शेवटी फेब्रुवारी महिन्यात नगराध्यक्ष राऊत दिर्घ रजेवर गेल्यात. प्रभार उपाध्यक्ष जगन उईके यांच्याकडे आला. मुख्याधिकारी परिहार यांचे स्थानांतरण झाले. मुख्याधिकारी म्हणून माधवी मडावी रुजू झाल्या. अग्निशमन दलाच्या वाहनाच्या वादातून एकाच वेळी नगराध्यक्ष रजेवर गेले अन् मुख्याधिकारी यांचे स्थानांतरण झाले. यावेळी साकोलीत शंकाकुशंकाना उधाण आले.
यानंतर लॉकडाऊन झाले. त्यामुळे प्रकरण शांत झाले. मात्र ३० एप्रिल रोजी नगर परिषदेच्या अग्निशमन वाहनाचे भंडारा आरटीओ कार्यालयातून रजिस्ट्रेशन झाले आणि पुन्हा नगरसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली. या वाहनाचा क्र. एम एच ३६ एए २०५४ असा असून विमा फेब्रुवारी २०२१ पर्यंत आहे. नियमाप्रमाणे रजिस्ट्रशेन झाल्यावर सदर वाहन नगर परिषद कार्यालयाला हस्तांतरीत करणे गरजेचे होते. मात्र आता रजिस्ट्रेशन होऊन ११ दिवसांचा कालावधी लोटला तरी सदर वाहन साकोली नगरपरिषदेमध्ये आले नाही. त्यामुळे यात काही तरी गोडबंगाल आहे, अशा चर्चा साकोलीत सुरु आहे.

वाहनाची किंमत ९१ लाख ५० हजा
च्\साकोली नगरपरिषदेने खरेदी केलेल्या या अग्निशमन वाहनाची किंमत ९१ लाख ५० हजार रुपये आहे. आतापर्यंत साकोली नगरपरिषदेतर्फे या वाहनासाठी ७१ लाख रुपये दिले आहे. मात्र या सर्व प्रकाराला नगरसेवकांचा विरोध आहे.
मुख्याधिकाऱ्यांचे स्थानांतरण तडकाफडकी कसे?
दलाचा वाहनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रकरण उजेडात आले. त्यानंतर अवघ्या दहा दिवसात तत्कालीन मुख्याधिकारी परिहार यांचे स्थानांतरण झाले. त्यांचे तडकाफडकी स्थानांतरण कसे असा प्रश्न विचारला जात आहे.

अग्निशमन वाहनाचे ३० एप्रिल रोजी रजिस्ट्रेशन झाले. त्यानंतर ही गाडी साकोलीत न आणता सोलापूरला का ठेवण्यात आली. त्यामुळे नगरपरिषदेतर्फे ९ मे रोजी फायर सर्व्हिस कंपनीला तीन दिवसाचा आत वाहन परत करा अन्यथा तुमच्या विरोधात पोलिसात तक्रार करु असे पत्र दिले आहे.
- माधुरी मडावी, मुख्याधिकारी

Web Title: Gaudbengal in Sakoli of fire vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.