शिक्षणातील गरुडझेप जोतिबा व सावित्रींच्या पुण्याईने - मेश्राम

By Admin | Updated: April 12, 2015 01:10 IST2015-04-12T01:10:46+5:302015-04-12T01:10:46+5:30

देशातील शिक्षणाची गरुडझेप ही महात्मा जोतिबा फुले व सावित्रीआई फुले यांच्या पुण्याईने लाभली आहे.

Garuda-jaap in education, Jyotiba and Savitri's daughters-meshram | शिक्षणातील गरुडझेप जोतिबा व सावित्रींच्या पुण्याईने - मेश्राम

शिक्षणातील गरुडझेप जोतिबा व सावित्रींच्या पुण्याईने - मेश्राम

दिघोरी (मोठी) : देशातील शिक्षणाची गरुडझेप ही महात्मा जोतिबा फुले व सावित्रीआई फुले यांच्या पुण्याईने लाभली आहे. विविध क्षेत्रात देशाने जी असामान्य कामगिरी केली आह,े ती शिक्षणाच्या जोरावरच. सर्वसामान्य गरीब व बहुजनांना सुद्धा शिक्षणाचा समान अधिकार मिळावा, यासाठी महात्मा ज्योतीराव फुले यांचे कार्य बहुमुल्य आहे. सावित्रीआर्इंना अनेक अडचणींचा त्रास सहन करावा लागला. परंतु प्रत्येक प्रसंगाला सामोरे जात त्यांनी स्त्री शिक्षण व शिक्षणाचा समान अधिकार यासाठी आपले कार्य अविरत सुरुच ठेवले, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य व्यंकट मेश्राम यांनी केले.
महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्णाकृती प्रतिमेच्या अनावरण प्रसंगी जिल्हा परिषद हायस्कुल दिघोरी मोठी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते ुबोलत होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले व जोतिबा फुले यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली शैक्षणिक वाटचाल पुढे न्यावी. अशा थोर व्यक्तीमत्वाचे धनी असलेल्यांचे विचार कायम आपल्या हृदयात ठेवून शिक्षण घेतल्यास शैक्षणिक जीवनात प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही व आपण निर्धारित केलेल्या लक्ष्यापर्यंत आपण सहज पोहचू शकेल.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती प्रतिमेचे उद्घाटन महिला व बालकल्याण सभापती रेखा भुसारी यांनी केले. महात्मा जोतिबा फुले यांचे जयंतीनिमित्त प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शंकरराव खराबे, उपसरपंच टिकाराम देशमुख, पंचायत समिती सदस्या जासवन नंदेश्वर, ग्रामपंचायत सदस्य मार्कंड हुकरे, हेमराज शहारे, घुबडे, मदनकार, ओम करंजेकर, तंटामुक्त अध्यक्ष वसंत हटवार, प्राचार्य रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांनी जयंती तथा सावित्रीबाई फुले यांच्या केलेल्या कार्याची आठवण विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देत राहावी, यासाठी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट मेश्राम यांनी सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती रेखा भुसारी यांनी मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
संचालन शिक्षक भैसारे यांनी केले तर आभार शिक्षक भुरे यांनी मानले. कार्यक्रमानंतर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती. (वार्ताहर)

Web Title: Garuda-jaap in education, Jyotiba and Savitri's daughters-meshram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.