फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी म्हणजेच आनंदाची पर्वणीच. हिंदू संस्कृतीत होळी व धुळवळीला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत प्रत्येक क्षणाला विशेषच महत्त्व असतेच.
पालांदूर येथे दुसऱ्या सत्रात गरदेव यात्रा मोठ्या उत्साहात म्हणता येणार नाही, परंतु पारंपरिक तेचा आधार घेत, वर्षातून एकदा येत असलेल्या गरदेव यात्रेत गावकऱ्यांनी हजेरी लावली होती. बाजारपेठही खूप मोठी फुलली नाही, १०० रुपये किलोने गाठी विकल्या गेली. डहाके वाद्य हे झाडीपट्टी संगीत साहित्यात सन्मानाचे वाद्य म्हणून प्रचलित आहे. जग कितीही प्रगतशील झाले, तरी जुन्या आठवणींना उजाळा दिल्यास निश्चितच जुने साहित्य, वाद्य संगीत, गाणे हुबेहूब मनाला आनंद देतात. असाच ग्रामीण वाद्यकलेचा वारसा ठरलेला डहाके वाद्य गरदेव यात्रेत आकर्षणाचा ठरला. गरदेव यात्रेत पुजारी मनोभावे खंडोबा देवाची पूजा करून पारंपरिक वाद्य डहाके वाजवीत लोकगीतांची झलकार सादर करून रोख बक्षीस मिळवितात. खंडोबा देवाचे नाव घेत, देणगीदात्यांचे नाव विविध अलंकारांनी सजवून त्यांचा सन्मान आपल्या झाडीपट्टी वाणीतून ध्वनिक्षेपकाचा आधाराने संपूर्ण गरदेव यात्रेत ऐकविला जातो.
पानपुडावर बहिष्कार
भजन संध्या कार्यक्रम आटपून गावकरी गावच्या मंदिरात, चावडीवर रात्रीच्या वेळी एकत्रित येतात. आपुलकीच्या भावनेने स्नेह वृद्धिंगत करीत पानपुडाचा कार्यक्रम सांभाळीत असत, परंतु कोरोनाचे संकट वाढल्याने पालांदूर परिसरातील बऱ्याच गावात पानपूड कार्यक्रम स्थगित करण्यात आला हे विशेष!