करडीचे ग्रामविकास अधिकारी निलंबित

By Admin | Updated: June 14, 2014 01:38 IST2014-06-14T01:38:04+5:302014-06-14T01:38:04+5:30

ग्रामपंचायतीचा विविध निधींची स्वमर्जीने विल्हेवाट व अफरातफर प्रकरणी करडी ...

Garbage Development Officer suspended | करडीचे ग्रामविकास अधिकारी निलंबित

करडीचे ग्रामविकास अधिकारी निलंबित



करडी (पालोरा) : ग्रामपंचायतीचा विविध निधींची स्वमर्जीने विल्हेवाट व अफरातफर प्रकरणी करडी (पालोरा) येथील ग्रामविकास अधिकारी जयंत डांगरे यांना निलंबित

करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल द्विवेदी यांनी केली. याप्रकारामुळे गावात चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत असे की, करडी ग्रामपंचायतीच्या निधीच्या बाबतीत तफावत असल्याचे उघडकीला आले होते. या आशयाची माहिती व प्रकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन

अधिकाऱ्यांच्या दालनात पोहचले होते. संपूर्ण प्रकाराची शहानिशा करून सीईओ द्विवेदी यांनी ग्रामविकास अधिकारी डांगरे यांचे निलंबन केले. डांगरे यांच्यावर करडी

ग्रामपंचायतीच्या निधीमध्ये अखेर शिल्लक रकमेमध्ये कमी रक्कम दर्शविणे, निधीची अफरातफर करणे, प्रमाणकाशिवाय खर्च करणे, बँकेतून निधीची उचल करणे, परंतु

रोकडवहीत नोंद न करणे, इतर विविध निधीचा उपहार करणे आदीचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासर्व प्रकरणात ते दोषी आढळून आले आहेत.
जयंत डांगरे यांच्या निलंबनाचे आदेश दि.६ जून २०१४ रोजी सीईओंच्या स्वाक्षरीनिशी निघाले आहेत. त्यांच्या निलंबनामुळे संबंधित पदाचा प्रभार जांभोरा येथील ग्रामविकास

अधिकारी चाणप यांच्याकडे देण्यात आला आहे. डांगरे यांच्या निलंबना समितीची माहिती पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी आगलावे तथा पंचायत विस्तार अधिकारी

लक्ष्मीकांत बोहटे यांनी दिली. या प्रकारामुळे करडी येथे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. (वार्ताहर)

Web Title: Garbage Development Officer suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.