शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ आवश्यक
By Admin | Updated: May 1, 2015 00:50 IST2015-05-01T00:50:02+5:302015-05-01T00:50:02+5:30
विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळाला महत्व द्यावे.

शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ आवश्यक
कोंढा कोसरा : विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळाला महत्व द्यावे. लहान वयात मुलांनी परीक्षा संपल्यावर ग्रीष्मकालीन शिबिरात सहभागी होऊन मन आणि शरीर मजबूत करावे, असे विचार संस्थाध्यक्ष अॅड. आनंद जिभकाटे यांनी गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढा येथे शिबिराच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले.
विद्यालयात १६ ते २५ एप्रिल दरम्यान ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराचा समारोप संस्थाध्यक्ष अॅड. आनंद जिभकाटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्था उपाध्यक्ष रामदास शहारे, माजी पोलीस पाटील वामनराव जिभकाटे, प्रा. चरणदास बावणे, प्राचार्य जी.के. वैद्य, विश्वस्त मनोहर देशमुख, सुदाम खंडाईत, प्राचार्य विमल दुबे, मुख्याध्यापक सलामे, पर्यवेक्षक काटेखाये उपस्थित होते.
यावेळी बोलताना अॅड.आनंद जिभकाटे म्हणाले, गांधी विद्यालय कोंढा येथील विद्यार्थी दरवर्षी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, क्रीडा स्पर्धेत यश मिळवित आहे. हे माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे.
मानवी जीवनात खेळाला खूप महत्व प्रत्येकांनी द्यावे. या शिबिरात २०४ विद्यार्थी सहभागी झाले. त्यांना कराटे, योगा, चित्रकला, ट्रॅकींग रोप यांचे प्रशिक्षण दिले. यावेळी १० दिवसाच्या प्रशिक्षणात काय प्राप्त झाले याचे मनोगत निखिता डाखोरे, मनोहर हटवार, श्रुती गिरडर, भावेश जिभकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिबिर प्रमुख डी.बी. पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डी. बी. पटले, आभार आर.एन. भोपे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक डी.बी. पवार, निशांत नेवारे, ऋषी सुपारे, आर. एन. भोपे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)