रेल्वे आरक्षण तिकिटाची अवैध विक्री करणारा युवक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:59 AM2019-08-09T00:59:45+5:302019-08-09T01:00:22+5:30

रेल्वे आरक्षित तिकीट अवैधरित्या विक्री करणाऱ्या एका इसमाला आरपीएफने सापळा रचून अटक केली. मागील पाच वर्षापासून अवैधरीत्या तिकीट विक्रीचा गोरखधंदा सुरु होता. गुप्त माहितीच्या आधारावर तुमसर रोड आरपीएफने ही मोठी कारवाई केली.

Gajaad, a youth selling illegal train reservation tickets | रेल्वे आरक्षण तिकिटाची अवैध विक्री करणारा युवक गजाआड

रेल्वे आरक्षण तिकिटाची अवैध विक्री करणारा युवक गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्देरेल्वे पोलिसांची कारवाई : पाच वर्षांपासून सुरु होता गोरखधंदा

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रेल्वे आरक्षित तिकीट अवैधरित्या विक्री करणाऱ्या एका इसमाला आरपीएफने सापळा रचून अटक केली. मागील पाच वर्षापासून अवैधरीत्या तिकीट विक्रीचा गोरखधंदा सुरु होता. गुप्त माहितीच्या आधारावर तुमसर रोड आरपीएफने ही मोठी कारवाई केली. आरोपीविरुद्ध रेल्वे अधिनियम १४३ अंतर्गत कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आस्तिक अमृत भवसागर रा.नाकाडोंगरी असे आहे.
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे आस्तिक भवसागर याचे रेल्वे आरक्षण करण्याचे काउंटर आहे. सदर केंद्रावरून अवैधरीत्या नियमबाह्यपणे रेल्वे प्रवाशांना तिकीट विक्री करीत होता. मागील पाच वर्षापासून त्याचा गोरखधंदा सुरु होता. याबाबत रेल्वे प्रशासनाला माहिती प्राप्त झाली. तुमसर रोड येथील रेल्वे सुरक्षा दलाचे प ोलीस निरीक्षक विजय भालेकर, आरपीएफ अनिल पाटील, ताराचंद कुमावत, प्रशांत दुबे, धरमसिंग, हेमराज साकुरे, रमेश यादव यांनी सापळा रचला.
आरोपी आस्तिक भवसागर याला रेल्वे सुरक्षा बल अधिकाऱ्यांनी सापळा रचून अटक केली. रेल्वे अधिनियम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा बलाच्या अधिकाºयांना सदर माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
रेल्वे नियमानुसार नियमबाह्यपणे आरक्षित प्रवाशी तिकीट विक्री करता येत नाही. आॅनलाईन प्रक्रियेद्वारे सध्या रेल्वेचे आरक्षण करण्यात येते .मागील पाच वर्षापासून सदर गोरखधंदा आरोपीकडून सुरु होता. स्टेशन अधीक्षक राजेश गिरी, रेल्वे समिती सदस्य आलम खान यांनी सदर कारवाईचे कौतूक केले आहे. तुमसर येथील रेल्वे सुरक्षा दलाची ही मोठी कारवाई मानली जात आहे.

Web Title: Gajaad, a youth selling illegal train reservation tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.