गाव करी ते राव न करी! ऑक्सिजन खरेदीसाठी लोकवर्गणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:42+5:302021-04-23T04:37:42+5:30
तुमसर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण परिसरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोना संसर्गाची लढा कसा द्यावा ही विवंचना आहे. गावागावात ...

गाव करी ते राव न करी! ऑक्सिजन खरेदीसाठी लोकवर्गणी
तुमसर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण परिसरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोना संसर्गाची लढा कसा द्यावा ही विवंचना आहे. गावागावात आणि घराघरात रुग्ण आहेत. ऐनवेळी गावातील कुणाला ऑक्सिजनची गरज भासल्यास काय? अशा कठीण काळात तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा गावातील नागरिकांनी नवा आर्दश निर्माण केला. ऑक्सिजन खरेदीसाठी लोकवर्गणी करायला सुरुवात केली. यामुळे गावकऱ्यांत नवीन उमेद जागृत झाली. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आता गावकरी एकवटले आहेत.
तुमसर तालुक्यात गर्रा बघेडा ३,६०० लोकसंख्येचे गाव. सांसद आदर्श ग्राम म्हणूनही या गावाची ओळख. ग्रामीण परिसरातही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपचाराची सोय ग्रामीण भागात नसल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या उपचारासाठी शहराशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसऱ्या लाटेत रुग्णाला ऑक्सिजनची गरज पडत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांजवळ वेळेवर पैसा राहत नाही. त्यामुळे ऑक्सिजन कसे खरेदी करावे, असा प्रश्न उभा आहे. त्यामुळे गावातील युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी येथे एक शक्कल लढवली.
येथील रुग्णांसाठी लोकवर्गणीतून ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करण्याच्या निर्णय घेतला. एका व्यक्तीच्या नावाने बँकेमध्ये खाते उघडण्यात आले आहे. त्या खात्यावर स्वमर्जीने गावातील नागरिकांनी देणगी स्वरूपात राशी घालण्याचे ठरले. येथील कुणी पाचशे, एक हजार, तर कोणी ५ हजार रुपये बँकेत जमा करणे सुरू केले. माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश रहांगडाले यांनी ५ हजार रुपयांची देणगी दिली.
बॉक्स
आरोग्य उपकेंद्राला देणार ऑक्सिजन सिलिंडर
गावातील एखादा रुग्णाला ऑक्सिजनची गरज पडल्यास ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करून आणणे व गावांतील प्राथमिक उपकेंद्रांमध्ये त्याची सोय करून देण्याचा निश्चय करण्यात आला.
गर्रा बघेडा येथे एकतेचे दर्शन घडत असून संकटाच्या समयी ग्रामस्थानी एकजूट होत आहेत. होणे गरजेचे असून नेहमी एकत्र राहावे, असा संदेश दिला. त्यामुळे गावामध्ये चिंतेचे वातावरण कमी होण्यास मदत होत आहे. शासन व प्रशासनाने गावाकडे कोविड सेंटर उभारण्याची गरज आहे.