फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:01:49+5:30

शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी मालाची बोली बोलताना शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. येथे मास्क घातला जात नाही. सुमारे दोन तास अशीच गर्दी संपूर्ण बाजार समितीत होती. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी बाजार समिती आहे. मोठी उलाढाल येथे होते. जिल्ह्यातील प्रमुख मोठी बाजारपेठ आहे. जिल्हा प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचे निर्देश दिले आहेत. परंतु सर्रास गर्दी येथे मोठ्या प्रमाणात दिसून येते.

The fuss of physical distance | फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

Next
ठळक मुद्देतुमसर येथील प्रकार : कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव थांबविण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. मात्र तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सामाजिक अंतर पाळले जात नाही.
शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करण्यासाठी परवानगी शासनाने दिली आहे. परंतु त्यासोबतच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे. शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषी मालाची बोली बोलताना शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. येथे मास्क घातला जात नाही. सुमारे दोन तास अशीच गर्दी संपूर्ण बाजार समितीत होती. तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी बाजार समिती आहे. मोठी उलाढाल येथे होते. जिल्ह्यातील प्रमुख मोठी बाजारपेठ आहे. जिल्हा प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचे निर्देश दिले आहेत. परंतु सर्रास गर्दी येथे मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यामुळे याठिकाणी गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने प्रशासनास ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.
बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे संघटक जगदीश त्रिभुवनकर, विभाग प्रमुख अमित मेश्राम यांनी प्रत्यक्षात बाजार समितीत जाऊन पाहणी केली. दरम्यान मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली. त्यामुळे याविषयी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, प्रभारी सचिव मिनाक्षी वासनिक, उपसचिव अनिल भोयर यांना शिवसेनेने जाब विचारला. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी आपण काय उपाययोजना केले आहात? निष्काळजीपणामुळे जर एखादी कोरोना रुग्ण आढळून आला तर बाजार समिती त्याला जबाबदार ठेवण्यात येईल असा इशारा दिला.

गत दोन दिवसांपासून शेतमालाची आवक जास्त प्रमाणात झाल्यामुळे कास्तकारांनी गर्दी केली आहे. याठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून अनेकदा सूचना दिल्या जातात. परंतु कास्तकार ऐकत नाही. बाजार समितीत गर्दी नियंत्रण ठेवण्यासाठी बाजार समितीचे सचिव तथा उपसचिवांना जबाबदारी सोपवली आहे. तसेच गर्दीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करीत आहोत.
-भाऊराव तुमसरे,
सभापती, बाजार समिती, तुमसर

Web Title: The fuss of physical distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.