रोहयो कामावर फिरत्या पोलीस ठाण्याचे कामकाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:35 IST2019-03-29T22:34:00+5:302019-03-29T22:35:48+5:30
मनात जिद्द असली तर अशक्य ते शक्य करता येते. याचा प्रत्यय नुकताच आला. शनिवारीय फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन देव्हाडा/नरसिंगटोला गावात होते. मात्र तलावाचे रोहयो कामामुळे गावात कुणीही दिसेनासे झाल्याने ठाणेदार विजय पोटे यांनी चक्क रोहयो कामावर फिरते पोलीस स्टेशनचे कामकाज चालविले. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच उपयुक्त माहितीचे मार्गदर्शन केले.

रोहयो कामावर फिरत्या पोलीस ठाण्याचे कामकाज
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मनात जिद्द असली तर अशक्य ते शक्य करता येते. याचा प्रत्यय नुकताच आला. शनिवारीय फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन देव्हाडा/नरसिंगटोला गावात होते. मात्र तलावाचे रोहयो कामामुळे गावात कुणीही दिसेनासे झाल्याने ठाणेदार विजय पोटे यांनी चक्क रोहयो कामावर फिरते पोलीस स्टेशनचे कामकाज चालविले. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच उपयुक्त माहितीचे मार्गदर्शन केले.
देव्हाडा/नरसिंगटोला येथे आयोजित फिरते पोलीस स्टेशनचे कामकाज जीथे नागरिक आहेत. तिथेच राबविण्याचा निर्णय करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पोटे यांनी घेतले. रोहयो काम सुरु असलेल्या तलावाच्या दिशेने निघाले. पोलीस व गावातील प्रतिष्ठांचा समुह रोहयो कामावर येतांना दिसल्याने अनेकांत काय झाले असावे, अशा शंकाची चर्चा सुरु झाली. मात्र, पोलिसांचा ताफा पोहचताच नागरिकांची गर्दी झाली. नागरिक आपले काम सोडून एकत्र आले. आज फिरते पोलीस स्टेशनचे आयोजन असून आपणा सर्वांना कायदेविषयक माहिती व आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच विविध उपयुक्त माहिती देण्यासाठी सर्व आलो आहोत. असे ठाणेदार विजय पोटे यांनी सांगताच अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला अन् दुपारच्या सुट्टीत कामकाजाला सुरुवात झाली.
फिरते पोलीस स्टेशन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ठाणेदार विजय पोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून देव्हाडा ग्रामचे उपसरपंच महादेव फुसे, पोलीस पाटील बोंदरे, ग्रामपंचायत सदस्य अरुण शेंडे, दुर्योधन बोंदरे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, रोजगार सेवक विजय बंसोड प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ठाणेदार पोटे यांनी लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा, मतदान आपला अधिकारच नाही तर राष्टÑीय कर्तव्य आहे. परंतू सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, कुणाची बदनामी होईल की अपमान होईल, असे कृत्य वा संदेश पाठवू नये, असे सांगितले. सायबर गुन्हेगारीवर प्रकाश टाकताना एटीएम बिघडल्याचे तसेच नविन कार्ड बनविण्याचे नावावर येणाऱ्या फोन किंवा संदेशावर विश्वास ठेवून एटीएम व ओटीपी नंबर देऊ नका, असे सांगून संभाव्य आर्थिक फसवणुकीपासून सावध केले. लैगिक अत्याचार, भ्रृण हत्या, हुंडा बळी व भांडण तंटे सामजस्याने सोडवावे. देव्हाडा येथील अवैध दारु विक्रीवर बंदीची मागणी नागरिकांनी लावून धरली.
फिरते पोलीस स्टेशनच्या आयोजनासाठी देव्हाडाचे बिट चे हवालदार राकेशसिंग सोलंकी, पालोरा बिटचे हवालदार विजय सलामे, होमगार्ड सैनिक यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी सुमारे १५० तर २५० महिला उपस्थित होत्या.