जीवघेण्या इमारतीत धोका पत्करून कामकाज
By Admin | Updated: October 14, 2016 00:24 IST2016-10-14T00:24:52+5:302016-10-14T00:24:52+5:30
ज्या विभागाकडून बांधकामाचे नियोजन केले जाते, बांधकामाला मंजुरी दिली जाते, नव्हे बांधकाम केले जाते,

जीवघेण्या इमारतीत धोका पत्करून कामकाज
भंडारा : ज्या विभागाकडून बांधकामाचे नियोजन केले जाते, बांधकामाला मंजुरी दिली जाते, नव्हे बांधकाम केले जाते, त्याच बांधकाम विभागाची ईमारत जीर्णावस्थेत असेल आणि त्या जीवघेण्या ईमारतीत धोका पत्करून अधिकारी व कर्मचारी कामकाज करीत असेल तर त्या विभागाला ‘बांधकाम’ म्हणायचे तरी कसे? असा प्रश्न जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या ईमारतीकडे बघितल्यानंतर भयावहता लक्षात येते. वृक्ष कोसळल्यानंतर ईमारत कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु सर्वचजण थोडक्यात बचावले.
जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे भंडारा, तुमसर, साकोली असे तीन उपविभाग आहेत. यापैकी भंडारा उपविभागाचे कार्यालय जिल्हा परिषदेच्या मागील बाजुला जीर्ण ईमारतीत आहे. ११ आॅक्टोबर रोजी या ईमारतीसमोर असलेल्या चार-पाच फुट व्यासाचे वृक्ष उन्मळून कोसळले. त्यावेळी या कार्यालयात शाखा अभियंता यांच्यासह ८ ते १० कर्मचारी व लोक होते.
याच ईमारतीला लागूनच जिल्हा स्वच्छता व पाणी मिशन कक्षाचे कार्यालय आहे. या कार्यालयात १६ कर्मचारी होते. हे विशाल वृक्ष कोसळताच सर्व कर्मचारी भयभीत होऊन बाहेर पडले. ज्या ईमारतीवर हे झाड कोसळले ती ईमारतच कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता, असे प्रत्यक्षदर्शी कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हे कार्यालय अन्य ठिकाणी स्थांनातरण करायचे म्हटले तरी जिल्हा परिषदेकडे पर्यायी व्यवस्था नाही. आज तिसऱ्या दिवशीही हे झाड ईमारतीवर पडलेल्या स्थितीतच आहे.
दरम्यान, शुक्रवारला जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीत हा मुद्दा येणार का? याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. दीड वर्षापूर्वीच्या सत्तांतरानंतर जिल्हा परिषदेच्या आवारात नवीन बांधकाम झालेले नाही, त्यापूर्वी दोन ईमारती बांधण्यात आले, आताच्या पदाधिकाऱ्यांनीही कामाला गती देण्याची गरज आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
३३ वर्षांपूर्वीचे गोदाम झाले कार्यालय