सखींनी केली ‘फुल टू धम्माल’

By Admin | Updated: December 9, 2015 00:50 IST2015-12-09T00:50:15+5:302015-12-09T00:50:15+5:30

लोकमत सखी मंचतर्फे भंडारा ‘फूल टू धमाल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

'Full to the Dhammal' by Sakhi | सखींनी केली ‘फुल टू धम्माल’

सखींनी केली ‘फुल टू धम्माल’

मल्लिका यांचे सौंदर्यावर मार्गदर्शन : प्राथमिक फेरी १० डिसेंबरपासून
भंडारा : लोकमत सखी मंचतर्फे भंडारा ‘फूल टू धमाल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात डॉ. मल्लिका यांनी सौंदर्य या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी केशसज्जा व प्रादेशिक साडी परिधान स्पर्धा घेण्यात आली. विजयी स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
डॉ. मल्लिका यांनी प्रत्येक वयोगटातील मुली व स्त्रियांची गरज ओळखून नैसर्गिकरीत्या तयार केलेले मॅजिकल ‘रुपसी पावडरचे प्रात्यक्षिक करुन प्रोजेक्टरवर माहिती दिली. यावेळी सभागृहातील शंभरहून अधिक सखींनी उत्स्फूर्तपणे मॅजिकल पावडरचे अनुभव घेतले. यावेळी आयोजित केशसज्जा स्पर्धेत हर्षा रक्षिये प्रथम, रोशन निकुडे द्वितीय तर कविता तिघरे हिला तृतीय क्रमांकाकरिता निवडण्यात आले. प्रादेशिक साडी परिधान स्पर्धेत मंगला क्षीरसागर प्रथम, वैशाली झाडे द्वितीय व प्रियंका धुर्वे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. कार्यक्रमाचे परीक्षण सौंदर्यतज्ञ वैशाली नशिने यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संयोजक ललित घाटबांधे, तर आभार जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी मानले. सुहासिनी अल्लडवार, मनीषा रक्षिये, ग्रीष्मा खोत, लतिशा खोत, स्नेहा वरकडे, दीपा काकडे, मनीषा इंगळे, संगीता भुजाडे, डॉ. पौर्णिमा, फटींग, सोनाली तिडके, सारिका मोरे, हर्षा बावणकर, वर्षा गौपाले, कांता बांते, अंजली वंजारी, शिल्पा न्यायखोर, राखी सूर, अर्चना गुर्वे व वंदना दंडारे यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)

तुमसर सखी महोत्सव लवकरच
तुमसर : लोकमत सखी मंच शाखा तुमसर येथे लवकरच तालुकास्तरीय सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. नियोजित स्पर्धेत विजयी स्पर्धक व चमूंना जिल्हास्तरीय सखी महोत्सवात सरळ प्रवेश देण्यात येईल. दि. १० ते १३ डिसेंबरदरम्यान विविध केंद्रावर स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येईल. तालुका महोत्सवात एकलनृत्य, युगल नृय, समूह नृत्य, एकपात्री अभिनय व पथनाट्य स्पर्धा घेण्यात येतील. करिता दि. १० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता मोहाडीतील गुरुदेव सत्संग मंडळ, दि. ११ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सिहोरा येथील प्रेमलता ठाकूर यांच्या राहत्या घरी, १२ डिसेंबर रोजी २ वाजता गोबरवाही येथील संजय धकाते यांच्या राहत्या घरी दि. १३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता तुमसर येथील शामसुंदर सेलिब्रेशन सभागृहात प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता मोहाडी विभाग प्रतिनिधी निशा पशिने (९९२३०११४२६), सिहोरा विभाग प्रतिनिधी प्रीती बांगरे (९७६४५७५७७८), गोबरवाही येथील विभाग प्रतिनिधी दुर्गा धकाते (९६०४९९१२३१) व तालुका विभाग प्रतिनिधी रितू पशिने (८१७७९३२६१३) यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)

Web Title: 'Full to the Dhammal' by Sakhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.