ठाणा परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा
By Admin | Updated: March 25, 2015 00:42 IST2015-03-25T00:42:44+5:302015-03-25T00:42:44+5:30
सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने धोरण आखले आहे. परंतु, जवाहरनगर परिसरात मागील काही दिवसांपासून दुर्गंधयुक्त पाण्याचा पुरवठा नळधारकांना केला जात आहे.

ठाणा परिसरात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा
जवाहरनगर : सर्वांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी शासनाने धोरण आखले आहे. परंतु, जवाहरनगर परिसरात मागील काही दिवसांपासून दुर्गंधयुक्त पाण्याचा पुरवठा नळधारकांना केला जात आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देवून जलस्त्रोत बदलवावे, अशी मागणी होत आहे.
जिल्हा प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत बेला, भोजापूर, उमरी, फुलमोंगरा, अशोकनगर, गोपीवाडा, शहापूर, ठाणा पेट्रोलपंप, परसोडी या गावातील १२०० नळधारकांना शुद्ध पेयजल पुरवठा केला जातो. तीन दिवसापुर्वी शुद्ध पाणी दिले गेले. मात्र आजघडीला काळसर पाणीपुरवठा होत आहे. या पाण्याचे मुख्य स्रोत कोरंभी वैनगंगा तीरावर जलसाठा आहे.
नदीपात्रात साचलेले पाणी थेट बेला जलकुंभात पोहचविले जाते. या नदीत नागनदीचे पाणी मिळत असल्याने शुद्ध पाण्यावर परिणाम होत आहे.
या गंभीर समस्येकडे जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. हेच पाणी नळधारक पिण्यासाठी वापर करीत आहे. याकडे जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. परिणामी जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी महिलांनी शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊल उचलण्याची गरज आहे. (वार्ताहर)