कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: March 24, 2017 00:36 IST2017-03-24T00:36:03+5:302017-03-24T00:36:03+5:30
शेतकरी कर्जाच्या खाईत फसले आहेत. त्यामुळे ते मुलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाही. आजारावर औषध घेण्यासाठी पैसे राहात नाही.

कर्जमुक्तीसाठी शिवसेनेचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा
साकोली : शेतकरी कर्जाच्या खाईत फसले आहेत. त्यामुळे ते मुलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाही. आजारावर औषध घेण्यासाठी पैसे राहात नाही. अशा स्थितीत तरी शासनाने विचार करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, या मागणीला घेवून शिवसेना जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले यवंच्या नेतृत्वात साकोली उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
भारत हा कृषी प्रधान देश आहे. शा देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढणे ही फारच लाजीरवाणी बाब आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या होणे ही बाब कुठपत योग्य आहे. शेतकऱ्यांवरील ार्ज माफ करण्यात यावे याकरिता शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे व शेतमालाला योग्य भाव द्यावे. २४ तास शेतकऱ्यांना वीज द्यावे व शेतकऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांवर गंभीर विचार करून त्वरीत घोषणा करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. या मोर्चात सहभागी शिवसेना जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख संजय रेहपाडे, राजेश बुराडे, संदीप वाकडे, पुरुषोत्तम सोनवाने, भरत वंजारी, युवासेना जिल्हा प्रमुख मुकेश थोटे, वाहतूक सेना प्रमुख दिनेश पांडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमीत एच.मेश्राम, जिल्हा विद्यार्थी सेना जितेश ईखार, जिल्हा कार्यकारिणी सचिव ओमेश्वर वासनिक, तालुका प्रमुख प्रकाश मेश्राम, हंसराज आगाशे, अरविंद बनकर, राजू ब्रम्हंकर, माजी तालुका प्रमुख नरेश करंजेकर, प्रमोद मेंढे, शहर प्रमुख सूर्यकांत इलमे, नितीन सेलोकर, नरेश बावनकर, युवा सेना तालुका प्रमुख प्रणय कांबळे, किशोर चन्ने, शुभम बारापों, विभाग प्रमुख हितेश बडवाईक व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)