पालांदुरात वीज कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: February 8, 2015 23:30 IST2015-02-08T23:30:00+5:302015-02-08T23:30:00+5:30
परिसरातील शून्य भारनियमन सुरु असतांना मागील महिन्याभरापासून भारनियमन सुरु झाले आहे. स्थानिक प्रतिनिधी, ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी, तोंडी कळवूनही सुधारण झाली नाही.

पालांदुरात वीज कार्यालयावर मोर्चा
पालांदूर : परिसरातील शून्य भारनियमन सुरु असतांना मागील महिन्याभरापासून भारनियमन सुरु झाले आहे. स्थानिक प्रतिनिधी, ग्रामस्थांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी, तोंडी कळवूनही सुधारण झाली नाही. अखेर दामाजी खंडाईत यांच्या नेतृतवात वीज कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वीज अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारुन भारनियमन कमी करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी मोर्च्याच्याच दिवशी असलेल्या जिल्हा नियोजन समितीपुढे भारयनियमाचा प्रश्न उभा केला. यावर पालकमंत्री दिपक सावंत, अधिक्षक अभियंता मेश्राम, कार्यकारी अभियंता धनविजे, जिल्हाअधिकारी आदीनी भारनियमनाचा प्रश्न निकाली काढीत आठ दिवसात वीज सुरळीत करण्याची ग्वाही दिली. खासदार नाना पटोले यांनीसुध्दा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करुन येत्या १० दिवसात पालांदूरचे भारनियमन कमी करण्याचे आश्वासन दिले आहे.
मोर्चा गांधी चौक - बसस्थानक मार्गे सरळ वीज कार्यालयावर धडकला. भारनियमन बंद करा, सिंगल फेस बंद करा अशा घोषणा करीत मोर्चेकरांनी आक्रोश व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी गाऱ्हाणे ऐकत मोर्चेकरांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत थेट मोर्च्यात आले. दामाजी खंडाईत, तुळशीराम भुसारी, कृष्णा जांभुळकर, इद्रिस लध्धानी, सरपंच शुभांगी मदनकर, वैशाली खंडाईत, हेमंत सेलोकर, प्रतिभा सेलोकर आदीनी मोर्च्याला संबोधित केले.
मोर्च्याला प्रा. आनंदराव मदनकर, हेमराज कापसे, विजस कापसे, मंगेश येवले, महेश हटवार, उमेश हटवार, रमेश हटवार, रोहिणी सेलोकर, कौशल्या वैरागडे, राजु पठाण, ईश्वर तलमले, इम्ररान भुरा आदीनी सहकार्य केले. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. (वार्ताहर)