मुसाफिरांचा मुक्तसंचार
By Admin | Updated: May 11, 2014 23:06 IST2014-05-11T23:06:54+5:302014-05-11T23:06:54+5:30
शहरात मागील काही दिवसांपासून परप्रांतीय मुसाफिरांचा मुक्तसंचार वाढला आहे. भटक्या टोळ्यांच्या (मुसाफीर) नोंदी ठेवण्यासाठी असलेल्या पोलीस ठाण्यांमधील नोंदवहीत ....

मुसाफिरांचा मुक्तसंचार
भंडारा : शहरात मागील काही दिवसांपासून परप्रांतीय मुसाफिरांचा मुक्तसंचार वाढला आहे. भटक्या टोळ्यांच्या (मुसाफीर) नोंदी ठेवण्यासाठी असलेल्या पोलीस ठाण्यांमधील नोंदवहीत या मुसाफिरांची नोंदच घेतली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतने केलेल्या पाहणीत पुढे आले आहे. शहरात मागील काही दिवसांपासून दरोडा, चोर्या, घरफोट्या, चेन स्क्रॅचिंगच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपासून शहरात मुसाफिरांचा मुक्तसंचारही वाढला आहे. कुठलीही परप्रांतीय व्यक्ती शहरात व्यवसायासाठी दाखल झाल्यास त्याला नियमानुसार संबंधित पोलीस ठाण्यातील मुसाफीर नोंद वहीत स्वत:च्या नावाची नोंद करावी लागते. या नोंदवहीत परप्रांतीयांची नोंद करण्याची जबाबदारी जेवढी मुसाफिरांची आहे, तेवढीच पोलिसांचीही आहे. परंतु पोलीस ही जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे. नोंदवहीत नावे नोंदविताना पोलीस मुसाफिरांकडून एक फॉर्म भरून घेतात. फॉर्म भरताना त्यांच्याकडील आधार कार्ड, मतदार ओळखपत्र व फोटो आयडीच्या झेरॉक्स प्रतींची मागणी पोलिसांनी करणे गरजेचे असते. मुसाफिरांचा फॉर्म भरून घेतल्यानंतर संबंधित मुसाफिराबद्दल तो मूळ रहिवासी असलेल्या पोलीस ठाण्याला माहिती देणे बंधनकारक असते. काही वर्षांपासून शहरातील काही पोलीस ठाण्यातील मुसाफीर नोंदवह्यांमध्ये परप्रांतीयांच्या नोंदी घेणे बंद झाले आहे. या नोंदवह्या पोलीस ठाण्यांमध्ये धुळखात पडलेल्या आहेत. पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांचा वार्षिक आढावा घेताना या मुसाफीर नोंद वहीचा आढावा घेणे आवश्यक असते. मात्र वरिष्ठ अधिकार्यांकडूनच याकडे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)