भंडारा शहरात मोकाट जनावरांचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:33 IST2021-03-08T04:33:05+5:302021-03-08T04:33:05+5:30
भंडारा : शहरातील खात रोड परिसरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढत आहे. दिवसा व रात्री मोकाट जनावरे ...

भंडारा शहरात मोकाट जनावरांचा मुक्तसंचार
भंडारा : शहरातील खात रोड परिसरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढत आहे. दिवसा व रात्री मोकाट जनावरे वावरत आहेत. शहरातून राज्य महामार्ग गेल्यामुळे रस्त्याला वर्दळ अधिक असते त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जनावरे रस्त्यात बसून संपूर्ण रस्ताच रोखून धरतात. या जनावरांमुळे कित्येक वाहनांचे अपघात झाले आहेत. यात कित्येक जनावरे व नागरिकही जखमी झाले आहेत. मोकाट जनावरांना नगर परिषदेने कोंडवाड्यात घालून प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. शहरातील खात रोड, बसस्थानक, गांधी चौक, जिल्हा परिषद चौक, शास्त्री चौक, राजीव गांधी चौक परिसरात आठ ते दहा मोकाट जनावरांचे कळपच फिरत असतात. वाहनधारकांसह नागरिकांना त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो.