‘आॅनलाईन शॉपिंग’मध्ये फसवणुकीचा धोका

By Admin | Updated: October 24, 2016 00:44 IST2016-10-24T00:44:40+5:302016-10-24T00:44:40+5:30

इंटरनेटमुळे व्यवहारांमध्ये सुलभता आली आहे; पण अनेक धोकेही येत आहेत.

Fraudulent risk in 'online shopping' | ‘आॅनलाईन शॉपिंग’मध्ये फसवणुकीचा धोका

‘आॅनलाईन शॉपिंग’मध्ये फसवणुकीचा धोका

विश्वासाहर्तावर प्रश्नचिन्ह : शहरासह ग्रामीण भागातही पडली भुरळ
भंडारा : इंटरनेटमुळे व्यवहारांमध्ये सुलभता आली आहे; पण अनेक धोकेही येत आहेत. चोरटेही आता या क्षेत्रात कार्यरत झाल्याची माहिती पूढे येत आहे. केवळ ज्ञान मिळवून शिक्षण घेऊन घरबसल्या दारोडा टाकता येत असल्याने चोरीची पद्धतही बदलल्याचे दिसते. शारीरिक कष्ट घेण्यापेक्षा चोरट्यांना आता केवळ ‘वेबसाईट हॅक’ करण्याचे ज्ञान मिळविणे इतकीच तसदी घ्यावी लागत असल्याने या क्षेत्रात चोरट्यांची संख्या वाढल्याची शक्यता नाकारता येत नाही. यातूनच ‘आॅनलाईन’ खरेदीत फसवणुकीच्या अनेक घटना उजेडात येत आहेत.
आॅनलाईन खरेदीच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे काही बाबींची खबरदारी घेणे गरजेचे असते. आॅनलाईन म्हणजे ‘इंटरनेट शॉपिंग’ करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. घरबसल्या खरेदी होत असल्याने बाजारातील गर्दी, वेळ आणि इंधनाची बचत होते; पण आॅनलाईन शॉपिंगबद्दल नागरिकांत शंका-कुशंका वाढत आहेत. अनेकांची यामुळे झालेली फसवणूक आणि आॅनलाईनची विश्वासाहर्ता यामुळे ग्राहकही अडचणीत येत असल्याचे दिसते.
स्वस्तातील स्मार्टफोन व इंटरनेटमुळे सध्या ग्रामीण भागातील व्यक्तीही ‘ब्राऊजिंग’ करून एकाच प्रकारातील शेकडो ‘प्रॉडक्टस’ आॅनलाईन पाहू शकतात. यामुळे पारंपरिक दुकान, स्टोअर्ससह मॉलमध्ये प्रत्यक्षात जाऊन होणारा वेळेचा अपव्यय टाळता येतो. ‘आॅनलाईन रिटेलिंग’मुळे खरेदीचा विस्तार झाला आहे. आॅनलाईन रिटेलिंगने खरेदीचे दालन सर्वांसाठीखुले केले आहे. यामुळे जे लोक रिटेलिंगपासून दूर होते, ते आता जवळ आले आहेत. आॅनलाईन रिटेलर्स ग्राहकांना काही वाजवी दरात विविध वस्तूंची विक्री करतात. जे ‘प्रॉडक्ट’ गावात मिळत नाही, त्याचीही खरेदी करणे यामुळे शक्य झाले आहे. वेबसाईटमुळे आपण कधीही आॅनलाईन खरेदी करू शकतो. यामुळे जे लोक जायबंदी आहे, अशा लोकांनाही बसल्या जागेवर वस्तूंची खरेदी करता येते. खरेदी करण्यापूर्वी आपण इंटरनेटवर विविध प्रॉडक्टबाबत संशोधन तसेच त्यांच्या किंमतीतील तुलना करू शकतो. जे विविध दुकान, स्टोअर्सला प्रत्यक्ष भेट देऊनही करता येत नाही. आॅनलाईन खरेदीचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. आॅनलाईन रिटेलर्स पारंपरिक दुकानाच्या तुलनेत वाजवी दरात प्रॉडक्टसची दुकानांच्या तुलनेत विक्री करीत असले तरी त्या प्रॉडक्टसच्या दर्जाबाबत कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. पारंपरिक दुकानांमध्ये जावून तुम्ही वस्तूची तत्काळ खरेदी केली तर ती वस्तू घरी यायला काही दिवस लागतात. आॅनलाईन खरेदी करताना फसवणुकीची शक्यता अधिक असते. यात प्रॉडक्टसाठी विक्री करणाऱ्या तिसऱ्या पक्षाकडून खरेदीदारांची फसवणूक होण्याची शक्यता असते. शिवाय संकेतस्थळांची विश्वासाहर्ता महत्त्वाची असते. (शहर प्रतिनिधी)

आॅनलाईन वस्तू परत करणे जिकरीचे
आॅनलाईन वस्तू परत करणे अत्यंत अवघड असते. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त वाहतुकीचा खर्च द्यावा लागतो. दुकानामध्ये वस्तू खरेदी करताना आपण वस्तू प्रत्यक्ष हातात घेऊन दर्जाबाबत खात्री करून घेतो. याउलट आॅनलाईन वस्तू आकर्षक व चमकदार वाटत असली तरी प्रत्यक्षात ती तशी असेलच, असे नाही. आॅनलाईन खरेदीमध्ये वाहतुकीच्या खर्चाबाबत प्रारंभी काहीच सांगितले जात नाही. नंतर मात्र हा शिपिंगचा म्हणजेच वाहतुकीचा अतिरिक्त खर्च या वस्तुच्या मूळ किंमतीमध्ये जोडला जातो. यात किंमत वाढून फसगत होते.

Web Title: Fraudulent risk in 'online shopping'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.