रेल्वेरुळावर चढली चारचाकी; चालकाची उडाली भंबेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:30 AM2019-06-01T11:30:50+5:302019-06-01T11:32:43+5:30

कधीकधी काही घटना अशा घडतात की ती कशी काय घडली असावी असा विचार करून आपण अचंबित व्हावे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर गावात शिवाजीनगर भागात शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास घडलेली ही घटना.

Four-wheeler on railway track; Driver in trouble | रेल्वेरुळावर चढली चारचाकी; चालकाची उडाली भंबेरी

रेल्वेरुळावर चढली चारचाकी; चालकाची उडाली भंबेरी

Next
ठळक मुद्देतुमसर येथील घटनानागरिकांनी ढकलून काढली रुळावरून बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: कधीकधी काही घटना अशा घडतात की ती कशी काय घडली असावी असा विचार करून आपण अचंबित व्हावे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर गावात शिवाजीनगर भागात शनिवारी सकाळी ७ च्या सुमारास घडलेली ही घटना. धनंजय दादलानी आपल्या चारचाकी गाडीने जात होते. रेल्वेरुळालगत असलेल्या रस्त्यावरून जात असताना तो रस्ता रुळाकडे वळत होता. त्या वळणावर त्यांचे गाडीवरील नियंत्रण ढळले आणि ती गाडी निर्धारित मार्ग सोडून थेट रेल्वेरुळावरच चढली. या मार्गावरून सकाळी ९ च्या सुमारास एक रेल्वेगाडी जाणार होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जवळपासच्या नागरिकांनी मग ही गाडी धक्का मारत मागे नेली व रेल्वेरुळाबाहेर काढण्यात त्यांना यश आले.

Web Title: Four-wheeler on railway track; Driver in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात