रेती चोरीचे चार ट्रॅक्टर पकडले
By Admin | Updated: January 18, 2016 00:32 IST2016-01-18T00:32:44+5:302016-01-18T00:32:44+5:30
रेतीची घाटांची लिलाव प्रक्रिया झालेली नसतानाही रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरला पकडले.

रेती चोरीचे चार ट्रॅक्टर पकडले
पोलिसांची कारवाई : तामसवाडी घाटावरील प्रकार
तुमसर : रेतीची घाटांची लिलाव प्रक्रिया झालेली नसतानाही रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरला पकडले. ही कारवाई तुमसर पोलिसांनी शनिवारला रात्री १० वाजताच्या सुमारास तामसवाडी घाटावर केली.
तालुक्यातील नदीपात्रांतील रेती घाटांची लिलाव प्रक्रिया पार पडली नसतानाही मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. शनिवारला तुमसर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी तामसवाडी घाटावरून रेतीची वाहतूक करणाऱ्या चार ट्रॅक्टरला चालकांसह ताब्यात घेतले. यात एमएच ३६ एल ३७६७, एमएच ३६ एल ५८९१, एमएच ३६ एल ३५३४, एमएच ३६ एल १९६ या ट्रॅक्टरचा समावेश आहे.
या कारवाईत पोलिसांनी आशिष रहांगडाले (२३), गौरीशंकर खरवडे (२३), श्याम पटले (३२) सर्व रा. डोंगरला व प्रमोद रहांगडाले (२४) रा. मिटेवानी या ट्रॅक्टर चालकांना ताब्यात घेवून ट्रॅक्टरमधील रेतीची तपासणी केली. यात चार ब्रास रेती असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर गवई यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक हावरे, धावडे, चौधरी, बडोले, सरणागत व वावरे यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)