‘समर्थ’च्या चार विद्यार्थ्यांची सैन्य दलासाठी निवड
By Admin | Updated: July 9, 2017 00:37 IST2017-07-09T00:37:33+5:302017-07-09T00:37:33+5:30
स्थानिक समर्थ महाविद्यालयात एनसीसीचे आदर्श पथक कार्यरत असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय पोहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली...

‘समर्थ’च्या चार विद्यार्थ्यांची सैन्य दलासाठी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : स्थानिक समर्थ महाविद्यालयात एनसीसीचे आदर्श पथक कार्यरत असून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय पोहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लेफ्टनंट प्रा.बाळकृष्ण रामटेके यांच्या नेतृत्वाखाली एनसीसी विभाग कार्यरत असून चार महाराष्ट्र बटालियनने महाविद्यालयाला मुलामुलींचे संयुक्त पथक मंजूर केले असून या अंतर्गत एनसीसी विभागातर्फे विविध समाजपयोगी कार्य केले जाते.
एनसीसी विभागाने स्वच्छता अभियानात केलेल्या कौतुकास्पद कामगिरीची दखल दूरदर्शन वाहिनीने घेतली होती. वृक्षारोपण, श्रमदान, रक्तदान शिबिर याबाबत एनसीसी विभाग सातत्याने प्रयत्नरत असून याशिवाय एनसीसी विभागातील अनेक विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय पथसंचलन दिल्ली येथे झालेली असून भारतीय सैन्य दलात तसेच पोलीस दलात समर्थ महाविद्यालयाचे एनसीसीचे विद्यार्थी कामगिरी बजावत आहेत. ही यशस्वी परंपरा यंदाही कायम असून सैन्यदलाच्या निवडीमध्ये शैलेशसिंग सोलंकी, दुर्पोस निर्वाण, दिपक दोनोडे, प्रणय घोनमोडे या चार एनसीसी कॅडेट्सची निवड झाली आहे.