दुचाकी अपघातात चौघे गंभीररित्या जखमी
By Admin | Updated: September 25, 2016 00:47 IST2016-09-25T00:47:08+5:302016-09-25T00:47:08+5:30
दिघोरीकडून लाखांदूरकरडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ४० आर ३२८५ या दुचाकीला मुर्झाकडून येणाऱ्या

दुचाकी अपघातात चौघे गंभीररित्या जखमी
मालदा येथील घटना : दोन दुचाकींची समोरासमोर धडक
दिघोरी (मोठी) : दिघोरीकडून लाखांदूरकरडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ४० आर ३२८५ या दुचाकीला मुर्झाकडून येणाऱ्या मालदा फाट्यावर सीजी ४ डि.के. २५०८ या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दोन्ही दुचाकीवरील पाच जणांपैकी ४ जण गंभीररित्या जखमी झाले. या चौघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुखरू किसन केरझरकर, ताराबाई सुखरू केरझरकर व तुलाराम बावणे रा. इटान ता. लाखांदूर येथील रहिवासी आहेत. ते सानगडीहून स्वगावी परतताना मालदा फाट्यावर मुर्झा येथून येणाऱ्या अशोक केशव बनसोड व सुमित्रा रामचंद्र ठलाल यांच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात पाचही जण फेकल्या गेले. यात ते गंभीररित्या जखमी झाले.
अशोक बन्सोड मुर्झा, सुमित्रा ठलाल मुर्झा, तुलाराम बावणे इटान व तारा केरझरकर इटान हे रस्त्यावर पडून असताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अविनाश ब्राम्हणकर तिथून जात असताना त्यांना त्यांनी रस्त्याने वाहनांना थांबवू सर्व जखमींना दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अशोक बन्सोड मुर्झा व तुलाराम बावणे इटान यांचेवर दिघोरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. (वार्ताहर)