एकाच कुटुंबात डेंग्यूचे चार रुग्ण

By Admin | Updated: May 15, 2014 23:16 IST2014-05-15T23:16:42+5:302014-05-15T23:16:42+5:30

साकोली तालुक्यातील सासरा येथील लोथे कुटूंबात सोनु शंकर लोथे, समीर शंकर लोथे, कमलेश शालिक लोथे, जावेद घनश्याम लोथे ही चारही बालके संशयीत डेंग्यूचे रुग्ण असल्याचे आढळून आले.

Four patients with dengue in the same family | एकाच कुटुंबात डेंग्यूचे चार रुग्ण

एकाच कुटुंबात डेंग्यूचे चार रुग्ण

सासरा : साकोली तालुक्यातील सासरा येथील लोथे कुटूंबात सोनु शंकर लोथे, समीर शंकर लोथे, कमलेश शालिक लोथे, जावेद घनश्याम लोथे ही चारही बालके संशयीत डेंग्यूचे रुग्ण असल्याचे आढळून आले.

यापैकी सोनु व समीर यांना उपचारार्थ नागपूर येथील हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले. तसेच कमलेश आणि जावेद साकोली येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे. ही चारही बालके एकाच कुटूंबातील असून १0 ते १५ वयोगटातील आहेत. सानगडी येथील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.रामटेके व डॉ.गांगुर्डे यांचेशी संपर्क साधले असता हे रुग्ण संशयीत डेंग्युचे असल्याची प्राथमिक तपासणीअंती ही माहिती दिली.

या आजारावरील प्रतिबंधात्मक उपायाविषयी विचारले असता गावात फवारणी करण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घ्यावा, गावात जनजागृती करावी, आरोग्य विभागाची मदत घ्यावी, गावात कुठेही दीर्घकाळ पाणी साचला राहू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी घरासभोवतीचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा, कोणत्याही आजाराची शंका उद्भवताच वेळीच आरोग्य विभागाची मदत घ्यावी, तपासणी करावी, गावात कोरडा दिवस पाळावा.

सर्वस्तरातून याविषयी जनजागृती करावी तसेच परप्रांतात पानफळीवर जाणारे व बाहेरगावी कामासाठी जाणार्‍या नागरिकांनी जाण्यापुर्वी व परत आल्यानंतर आरोग्य केंद्रात जावून आरोग्य तपासणी करावी, असे सांगितले.

आरोग्याचा प्रश्न वेळीच हाताळल्यास संभाव्य धोका टाळता येतील. यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आजार बळावले आहे. त्यावर उपाययोजनेची गरज आहे. ग्रामीण भागात कोणत्याच गावात धुर फवारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. (वार्ताहर)

Web Title: Four patients with dengue in the same family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.