चार घरांना आग, दोन भस्मसात
By Admin | Updated: March 6, 2016 00:14 IST2016-03-06T00:14:21+5:302016-03-06T00:14:21+5:30
मांडेसर येथील चार घरांना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजतादरम्यान शार्ट सर्कीटमुळे आग लागली.

चार घरांना आग, दोन भस्मसात
मांडसर येथील घटना : लाखोंचे नुकसान
मोहाडी : मांडेसर येथील चार घरांना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजतादरम्यान शार्ट सर्कीटमुळे आग लागली. आगीत दोन घरे जळून भस्मसात झाली. दोन घरांना वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. या आगीमुळे जवळपास २ लाख ५० हजार रूपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
तालुक्यातील मांडेसर येथील शोभेलाल श्रीराम बशिने व अंतकला शिवचरण बशिने या शेतकऱ्यांच्या घराला ४ मार्च रोजी ६ वाजतादरम्यान शार्ट सर्किटमुळे आग लागली. पाहता पाहता संपूर्ण घराने पेट घेतला. यात रोख २५ हजार रूपये, दागीने, अन्न धान्य व गृहोपयोगी वस्तू जळुन खाक झाली.
या आगीमुळे बळीराम पंचम बशिने व झनक डिलीराम बशिने यांच्या घरांना सुद्धा झळ पोहचली. त्यांच्या घरांना अंशत: नुकसान झाले. शोभेलाल बशिने यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण घर जळाल्याने व अन्न धान्यही जळाल्याने उदरनिर्वाह करावे तरी कस, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. तलाठ्यांनी पंचनामा करून अहवाल तहसिलदार मोहाडी यांना दिला आहे.
तलाठ्यांच्या पंचनाम्यानुसार शोभेलाल बशिने यांचे एक लाख ७३ हजार रूपयांचा, अंतकला शिवचरण बशिने यांचे ५४ हजार रूपयांचा, बळीराम बशिने यांचा १,८०० रूपयांचा व झनक बशिने यांचा तीन हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. शासनाने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)