चक्क चार फूट लांबीची चवळीची शेंग; भंडारा जिल्ह्यातील चमत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 16:04 IST2020-10-06T16:03:56+5:302020-10-06T16:04:18+5:30
agriculture, Bhandara News भाजीपाल्याची नवनवीन बियाणे विकसीत होण्याच्या या काळात ब्रिंजल चवळी या वाणाची पेरणी केल्यानंतर तब्बल चार फूट लांबीची चवळीची शेंग वेलाला लागली आहे.

चक्क चार फूट लांबीची चवळीची शेंग; भंडारा जिल्ह्यातील चमत्कार
दयाल भोवते
भंडारा : भाजीपाल्याची नवनवीन बियाणे विकसीत होण्याच्या या काळात ब्रिंजल चवळी या वाणाची पेरणी केल्यानंतर तब्बल चार फूट लांबीची चवळीची शेंग वेलाला लागली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील सरांडी (बु) येथील मुनेश्वर राऊत यांच्या शेतात या शेंगा बहरत आहेत.
त्यांनी काही दिवसांपूर्वी नातेवाईकाकडून ब्रिंजल नावाचे चवळीचे बियाणे आणले होते. त्यांनी पावसाळ््याच्या प्रारंभीच त्याची लागवड घरालगतच्या शेतजमिनीत केली. त्यांनी २५ वेलींची लागवड केली होती. त्यापैकी २३ वेलींना शेंगा आल्या आहेत. त्यापैकीच एका वेलीवर ४ ते ५ फूट लांबीच्या शेंगा लगडलेल्या आहेत. त्यांचे वजन दीड किलो एवढे आहे. या शेंगांची भाजी दोडक्याच्या भाजीसारखीच चविष्ट होते असे त्यांचे सांगणे आहे.
या शेंगेला बाजारपेठेत काय भाव मिळेल याबाबत त्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली. मात्र इतकी मोठी शेंग पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.