आंतरराज्यीय पुलावर चार फूट पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:37 IST2019-09-10T00:36:34+5:302019-09-10T00:37:01+5:30
मागील चार दिवसापासून तुमसर तालुक्यात पाऊस बरसत सुरु असून मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वैनगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तुमसर तालुक्यातील बपेरा आंतरराज्यीय पुलावरुन पाच ते सहा फुट पाणी वाहत आहे. दोन्ही राज्यातील वाहूक सेवा ठप्प पडली आहे.

आंतरराज्यीय पुलावर चार फूट पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर/चुल्हाड : बपेरा आंतरराज्यीय पूलावरुन वैनगंगेच्या पूराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प पडली आहे. रविवारी रात्रीपासून संजय सरोवरातून पाण्याचा विसर्ग सुरु केल्याने वैनगंगेला पूर आला आहे. पुलाच्या कमी उंचीचा येथे फटका बसत आहे. नदी काठावरील अनेक गावातील सखल भागात पाणी शिरले असून धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाम्हणी माडगी गाव शिवारापर्यंत पूराचे पाणी पोहोचले आहे. पुराने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
मागील चार दिवसापासून तुमसर तालुक्यात पाऊस बरसत सुरु असून मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वैनगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. तुमसर तालुक्यातील बपेरा आंतरराज्यीय पुलावरुन पाच ते सहा फुट पाणी वाहत आहे. दोन्ही राज्यातील वाहूक सेवा ठप्प पडली आहे. बपेरा येथे वैनगंगा नदीवर सुमारे २० ते २२ वर्षापुर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले. परंतु पुलाची उंची अतिशय कमी आहे. त्याचा फटका येथे बसत आहे.
भंडारा तालुक्यातील शिंगोरी ते चांदोरी मार्ग तब्-ल पाच दिवसांपासून बंद आहे. एखादा जीव गेल्यावर प्रशासन पूल बांधणार काय असा सवाल नागरिक विचारीत आहेत.
मध्य प्रदेश शासनाने निधी दिला नाही
यापूर्वी उन्हाळ्यात रपटा तयार करुन वाहतुक केली जात होती. संजय सरोवरातून पाण्याचा विसर्ग मध्यप्रदेश शासन करीत असल्याने वैनगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ होते. त्यामुळे नदी काठच्या गावांना पुराचा तडाखा बसतो. सध्या बपेरा, रेंगेपार, वाहनी, सितेपार, तामसवाडी, उमरवाडा, कोष्टी, बोटी, बाम्हणी, माडगी, ढोरवाडा, चारगाव येथील शेतशिवारताील पिकांना पुराचा तडाखा बसला आहे. बाम्हणी येथे गावापर्यंत पाणी पोहोचले आहे. नदीचे पात्र दिवसेंदिवस गावाच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे गावांना धोका निर्माण झाला आहे.
नाले ओव्हरफलो
तालुक्यातील लहान मोठे नाले ओव्हरफलो भरुन वाहत आहेत. नाल्याशेजारील शेतशिवारात अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे.
राष्ट्रीय महामार्ग बंद
तुमसर- गोंदिया राष्ट्रीयमहामार्गाची कामे संथगीतने मागील वर्षभरापासून सुरु आहे. दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे नाल्यांना पूर आला आहे. देव्हाडा शिवारात वैनगंगा नदीकडे जाणारा पूल भुईसपाट करण्यात आला. नविन पुलाचे काम सुरु आहे. येथील रपट्यावर तीन फुट पाणी वाहत असल्याने राष्ट्रीय महामार्ग सोमवार सकाळ पासून बंद आहे.
गोसेखुर्दचे ३३ दरवाजे २ मीटरने उघडले
अशोक पारधी।
पवनी : तालुक्यातील गोसेखुर्द प्ररल्पात पाणी पातळी २४३.६० मी होती. पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रकल्पाचे ३३ दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले. प्रकल्पातून वैनगंगा नदीपात्रात १३७३९ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सोमवारला सकाळपासून सुरू होता. त्यामुळे वैनगंगा नदीत येवून मिळणाऱ्या ओढ्यांची पाणी पातळी वाढली व पुरपरिस्थिती निर्माण झाली. प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
प्रकल्पातून विसर्ग होत असलेल्या पाण्याचा वेग अतिशिघ्र असल्याने धरणाचे सुरक्षा भिंतीलगतचा दोन्ही बाजूचा किणारा खचून धोका निर्माण झालेला आहे. सिंचन विभागाने प्रकल्पाचे खालच्या बाजूला असलेल्या पुलापर्यंत सुरक्षा भिंत तयार करून पर्यटकांसाठी किणाºयालगत फिरण्याची सोय उपलब्ध करून द्यावी. प्रचंड वेगाने प्रकल्पातून विसर्ग होत असलेला पाणी पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची मात्र निराशा झाली. धरण विभागाचे सुचनेनुसार सुरक्षा भिंतीवर उभे पाहून पाण्याचा विसर्ग पाहण्यास सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केला त्यामुळे पर्यटकांनी धोकादायक व खचत असलेल्या किणाºयावर चढून पाण्याचा विसर्ग पाहण्याचा आनंद लुटला. पर्यटकांना पुर्ण प्रकल्प एका नजरेत पाहता येईल यासाठी सुरक्षा भिंत तयार करण्यात आली परंतू प्रकल्प स्थळी आल्यानंतर पर्यटक ‘सेल्फी’चा मोह आवरू शकत नाही. जीवितहाणी टाळण्यासाठी धरण विभागाने सुरक्षा भिंतीवर जाण्यास मज्जाव केला असेल. परंतू पर्यटकांची संख्या कमी होवू नये यासाठी धरण विभागाने सुरक्षा भिंतीवर लोखंडी जाळीचे प्रयोजन करून पर्यटकांसाठी पाण्याचा विसर्ग पाहण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.