सालेबर्डी खून प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: December 2, 2023 20:16 IST2023-12-02T20:16:01+5:302023-12-02T20:16:15+5:30

यातून त्याचा काटा काढण्यात आला होता. यातील तीन आरोपींना पोलिसांनी एका दिवसात शोधून काढले.

Four days police custody for the accused in the Salebardi murder case | सालेबर्डी खून प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

सालेबर्डी खून प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी

भंडारा : भंडारा तालुक्यातील पांढराबोडी येथील तरुण नयन मुकेश खोडके (१९) यांच्या खून प्रकरणातील तीन आरोपींची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
नयनचा मृतदेह सालेबर्डी-कोरंभी नाल्यात हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला होता. एका तरुणीच्या प्रेम प्रकरणात, दुसऱ्या तरुणीचा प्रवेश झाला. यातून त्याचा काटा काढण्यात आला होता. यातील तीन आरोपींना पोलिसांनी एका दिवसात शोधून काढले.

शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले. खुनात वापरलेले साहित्य हस्तगत करण्यासाठी व इतर बाबींचा छडा लावण्यासाठी न्यायालयाने मंथन अशोक ठाकरे (१९, भोजापूर), साहिल शरद धांडे (१९, ठाणा पेट्रोलपंप), पूनम नरेंद्र कारेमोरे (१९, बीड सीतेपार) या तिघांनाही ५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे करीत आहेत.

Web Title: Four days police custody for the accused in the Salebardi murder case